डोळ्यांचे पारणे फिटेल 'अशी' मनसेची शिवाजी पार्कमधील रोषणाई, पहा फोटो

दरवर्षी प्रमाणे यंदाही मनसेचा दिपोत्सव सोहळा थाटात पार पडला. गेली १० वर्ष मनसे तर्फे दिपोत्सव आयोजित केला जातो. पण यावर्षी हा सोहळा खास होता कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित होते.

शिवाजी पार्क मैदानाच्या प्रवेशद्वारापासून रोषणाई

शिवाजी पार्क परिसरात रोषणाई

यासोबतच राज ठाकरे आणि त्यांचे कुटुंब देखील हजर होते. राजकारणातील त्रिदेव एकाच मंचावर असल्याने राजकीय समीकरणे बदलत असल्याच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आले आहे.

राज ठाकरे यांच्यासोबतच अमित ठाकरे आणि त्यांची पत्नी देखील यावेळी उपस्थित होते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे राज ठाकरे यांचा नातू देखील सोहळ्यात आई-बाबांसोबत दिपोत्सवचा आनंद घेताना दिसून आला. 

राज ठाकरे यांचा नातू

मनसे तर्फे गेली १० वर्षे दिपोत्सव साजरा होतोय. पण गेली दोन वर्ष कोरोनाचा सावट असल्याने सणांवर निर्बंध होते. पण आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. त्यामुळे यावेळी वेगळाच उत्साह दिपोत्सव सोहळ्यात पाहायला मिळाला. मुंबईकरांनी दिपोत्सव पाहण्यास गर्दी केली होती.

दादर इथला शिवाजी पार्क परिसर दिव्यांच्या रोषणाईने उठून दिसत आहे. राज ठाकरे यांचे घर देखील सजवण्यात आले आहे. परिसरात जागोजागी रोषणाई करण्यात आली आहे. यामुळे सेल्फी प्रेमींची तर इथे मंदियाळी पाहायला मिळत आहे. रोषणाईसोबतच मोठ-मोठे कंदील देखील नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहेत. 

राज ठाकरे यांचे निवासस्थान

हेही वाचा

राज ठाकरे, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस एकाच मंचावर, उद्धव ठाकरेंना टोला

पुढील बातमी
इतर बातम्या