Advertisement

राज ठाकरे, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस एकाच मंचावर, उद्धव ठाकरेंना टोला

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आयोजित केलेल्या दिपोत्सवाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली.

राज ठाकरे, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस एकाच मंचावर, उद्धव ठाकरेंना टोला
SHARES

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आयोजित केलेल्या दिपोत्सवाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली.

दिपोत्सव आपल्या सर्वांचं जीवन प्रकाशमय करो, ज्याप्रमाणे आपण याठिकाणी रोषणाई केली, तशीच सर्वांच्या मनामध्ये अगदी ही रोषणाई उजळून निघू द्या, सर्वांना सुखाचे समृद्धीचे दिवस येवो, यासाठी हे सरकार प्रयत्नशील राहील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केले.

सर्वांनाच दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. या शिवतीर्थावर राज ठाकरेंच्या संकल्पनेतून दिपोत्सव मागील 10 वर्षांपासून आयोजित केला जातो. या कार्यक्रमाला उपस्थित उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर सर्व मान्यवर सर्वांनाच दिवाळीच्या शुभेच्छा देताना आनंद होतोय. मागील 2 वर्ष कोरोनामुळे आपल्याला अनेक सण इच्छा असूनही मर्यादेमुळे साजरा करता आले नाही. सर्वांना सोबत घेऊन राज ठाकरे आणि त्यांचे सहकारी करताय, मी त्यांचं अभिनंदन करतो.

आपण दिवाळीमध्ये अनेक ठिकाणी सर्वजण आपापल्या परीने दिवाळीचा उत्सव साजरा करत असतो. यावर्षी आम्ही सर्व उत्सव जोरात करायचे ठरवले. तसेच ती कमिटमेंट आम्ही पूर्ण करतोय. गणपतीमध्ये, नवरात्रीमध्ये लोकांनी खूप आनंद घेतला. सर्वजण दबून बसले होते. मात्र, आता थोडा मोकळा श्वास घेतला असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही.

तुम्ही कधीही आम्हाला सांगता ते लोकांच्या, हिताचे विषय सांगता. शेतकऱ्यांसाठी देखील आपण मदत झाली पाहिजे, मदत झाली पाहिजे, हेदेखील तुम्ही आम्हाला सांगितलंय. आम्ही रात्री उशिरापर्यंत काम करत असतो, त्यामुळे राजसाहेब तुम्ही कधीही अगदी रात्री, मध्यरात्री अपरात्रीही आम्हाला भेटायला येऊ शकतात. आम्ही बिलकूल भेटणार, असे नाव घेता त्यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला.



हेही वाचा

Andheri East Assembly Bypoll: अंधेरी पोटनिवडणुकीतून भाजपकडून माघार

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा