Advertisement

Andheri East Assembly Bypoll: अंधेरी पोटनिवडणुकीतून भाजपकडून माघार

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतून माघार घेण्याची घोषणा भाजपने केली आहे.

Andheri East Assembly Bypoll: अंधेरी पोटनिवडणुकीतून भाजपकडून माघार
SHARES

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतून माघार घेण्याची घोषणा भाजपने (Announce Withdraw Candidate From Andheri East Bypoll) केली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी याबाबतची घोषणा केली. भाजप उमेदवार मुरजी पटेल (Muraji Patel) हे अपक्ष म्हणून देखील निवडणूक राहणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

भाजपकडून याबाबत आज घोषणा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. त्यानंतर आज बैठकीनंतर भाजप उमेदवार मुरजी पटेल हे माघार घेणार असल्याची घोषणा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. भाजपने उमेदवार मागे घेतला असला तरी इतर उमेदवार रिंगणात असल्याने निवडणूक होण्याची शक्यता आहे. 

रविवारी, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून निवडणूक बिनविरोध करण्याबाबतची विनंती केली होती. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीदेखील पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी असे मत व्यक्त केले होते.

शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांनीदेखील मुख्यमंत्री शिंदे यांना पत्र लिहून पोटनिवडणुकीतून उमेदवार मागे घेण्याची मागणी केली होती. त्यानंतर राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगल्या होत्या. भाजप उमेदवार मागे घेणार का, याबाबत पक्षाचे नेतृत्व निर्णय घेईल, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते. 

भाजप उमेदवार मुरजी पटेल यांनी निवडणुकीतून माघार घेणार असल्याची घोषणा भाजपकडून करण्यात आली. त्यानंतरही अंधेरी पूर्व मतदारसंघात पोटनिवडणूक होणार आहे. अंधेरी पूर्व मतदारसंघात शिवसेना ठाकरे गट आणि भाजप-शिंदे गटात मुख्य लढत होती. शिवसेना ठाकरे गट आणि भाजपशिवाय, इतर बारा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.



हेही वाचा

बनावट प्रतिज्ञापत्रांची सीआयडी किंवा सीबीआयमार्फत चौकशी करावी : नरेश म्हस्के

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा