या हिवाळी अधिवेशनात दडलंय काय? जाणून घ्या!

विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन येत्या ११ डिसेंबरपासून सुरू होत असून, २२ डिसेंबरला संपणार आहे. या अधिवेशनात काय होणार? कोण-कोणते अध्यादेश काढले जातील? कोणत्या विधेयकांना मंजुरी मिळेल? हे जाणून घेण्यासाठी सर्वच जण उत्सुक आहेत.

'१३ विधेयके, ११ अध्यादेश सादर करणार'

या अधिवेशनात १३ विधेयके आणि अकरा अध्यादेश सादर करण्यात येतील, अशी माहिती संसदीय कामकाज मंत्री गिरीश बापट यांनी मंगळवारी दिली. कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीनंतर विधानभवनात ते बोलत होते.

कामकाज सल्लागार समितीने ११ ते २२ डिसेंबरपर्यंतचं कामकाज निश्चित केलं आहे. या काळात १३ नवीन विधेयकं आणि ११ अध्यादेश विधीमंडळात मांडले जाणार आहेत. त्याशिवाय विधानपरिषदेतील प्रलंबित ५ विधेयके मांडण्यात येतील.

काय म्हणाले गिरीश बापट?

या बैठकीत अधिवेशनाचा कालावधी वाढवण्यात यावा, अशी मागणी विरोधी पक्षांनी केली. त्यानुसार २० डिसेंबरला पुन्हा कामकाज सल्लागार समितीची बैठक घेतली जाणार आहे. 'या बैठकीत अधिवेशनाचा कालावधी वाढवण्यावर विचार करून निर्णय घेतला जाणार आहे. विरोधात असताना आपणही अधिवेशनाचा कालावधी वाढवण्याची मागणी करत होतो. त्यावेळी जनतेचे प्रश्न मांडून आम्ही सभागृहाचे कामकाज करत होतो. गोंधळ करून कामकाज बंद पाडत नव्हतो. दुर्दैवाने आता तसे होत नाही. राज्य सरकार सर्व मुद्यांवर चर्चेला तयार आहे. विरोधकांनी कामकाजात सहभाग घ्यावा', असे आवाहनही गिरीश बापट यांनी यावेळी केले.


हेही वाचा

हिवाळी अधिवेशनापेक्षा भाजप नेत्यांना गुजरात निवडणुकीची चिंता?

पुढील बातमी
इतर बातम्या