Advertisement

हिवाळी अधिवेशनापेक्षा भाजप नेत्यांना गुजरात निवडणुकीची चिंता?


हिवाळी अधिवेशनापेक्षा भाजप नेत्यांना गुजरात निवडणुकीची चिंता?
SHARES

राज्याचं हिवाळी अधिवेशन ११ डिसेंबरपासून सुरू होत आहे. मात्र भाजपा नेत्यांना हिवाळी अधिवेशनापेक्षा गुजरात निवडणूक आणि राज्यातील इतर निवडणुकांमध्ये जास्त रस असल्याचं दिसत आहे. 'मुंबई लाइव्ह'ला विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या भाजपाने हिवाळी अधिवेशनापेक्षा निवडणुकांकडे जास्त लक्ष केंद्रीत केल्यानं बहुतांश आमदार, मंत्री अधिवेशनात गैरहजर दिसणार आहेत.


पहिले ४ दिवस मंत्री, आमदारांची दांडी

राज्याचं हिवाळी अधिवेशन ११ डिसेंबरपासून सुरू होत असतानाच गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी ९ आणि १४ डिसेंबरला मतदान होणार आहे. सोबतच राज्यातील जव्हार, डहाणू (नगर परिषद), वाडा (नगरपंचायत) येथील निवडणुका १३ डिसेंबरला होत आहे. त्यामुळे भाजपाचे बहुतांश आमदार आणि मंत्री या निवडणुकीच्या प्रचारासाठी मैदानात उतरणार आहेत.

परिणामी अधिवेशनातील पहिले काही दिवस ते गैरहजर असतील, अशी दाट शक्यता आहे. या नावांमध्ये आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल, कारण त्यांच्याच मतदारसंघात नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुका आहेत.


आशिष शेलार, प्रकाश मेहता गुजरातमध्ये

भाजपासाठी गुजरात निवडणूक प्रतिष्ठेची असल्यानं महाराष्ट्रातील अनेक मंत्री, आमदार गुजरातमध्ये प्रचारासाठी जाणार आहे. भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार आणि गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी आतापासूनच गुजरातमध्ये तळ ठोकल्यानं ते देखील अधिवेशनात दिसण्याची शक्यता फार कमी आहे. त्यामुळे राज्याचे प्रश्न सोडवण्यापेक्षा भाजपाचं लक्ष निवडणुकांकडे असल्याचं सध्या तरी चित्र आहे.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा