शरद पवारांची पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका

घाटकोपर - मोठ्या लोकांनी चुका केल्या तर त्यांना फासावर चढवा पण गरिबांच्या पैशाला काळा पैसा ठरवून त्यांना त्रास देऊ नका अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घाटकोपर येथे रविवारी राष्ट्रवादी काँग्रेसची परिवर्तन सभा झाली त्यावेळी शरद पवार बोलत होते.

सत्तेत येण्यापूर्वी मोदींनी म्हटलं होते की, गुन्हेगारी कमी करून दाखवणार, गुन्हेगारी कमी होणारच ना, कारण सर्व जण बँकेच्या रांगेत उभे आहेत असा चिमटा शरद पवार यांनी काढला. काही गमतीशीर उदाहरणे देऊन 500, 1000 च्या नोटबंदीच्या निर्णयावरून शरद पवारांनी मोदी सरकारवर टीकेचा निशाणा साधला.

परदेशी दौऱ्यात मोदी हे फक्त भारतीय लोकांनाच भेटतात त्या देशातील नागरिकांना भेटत नाहीत, असं सांगत मोदींच्या परदेश दौऱ्यांवरदेखिल त्यांनी टीका केली. मुंबईची लोकसंख्या वाढते आहे. यावर उपाय म्हणून लोकलची संख्या वाढवण्याचे सोडून केंद्र सरकार बुलेट ट्रेनवर अनेक कोटी खर्च करत आहेत याबाबतही पवारांनी नाराजी व्यक्त केली. सरकारच्या अनेक निर्णयांवर या वेळी शरद पवार यांनी टीकेची तोफ डागली.

पुढील बातमी
इतर बातम्या