पंतप्रधान मोदींनी केली 'ही' मोठी घोषणा

आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित करत आहेत. टीव्ही, रेडिओ आणि सोशल मीडियावरून नरेंद्र मोदी देशाला संबोधित करत आहेत. देशवासियांशी संवाद साधणार असल्याची माहिती बुधवारी सकाळी मोदींनी ट्विटरद्वारे दिली होती. या ट्विटमध्ये त्यांनी म्हटलं की, माझ्या प्रिय नागरिकांनो, बुधवारी सकाळी ११.४५ ते १२ या कालावधीत मी महत्त्वाचा संदेश घेऊन तुमच्याकडे येत आहे. लोकसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू असतानाच मोदी नेमकी काय घोषणा करणार, याकडे देशवासीयांचे लक्ष लागलं आहे.

महत्वाचे मुद्दे :

  • पंतप्रधान नेरंद्र मोदींचा राष्ट्राला उद्देशून संदेश
  • 'आंतरिक जगात भारताची अद्वितीय कामगिरी'
  • 'भारत आज अंतरिक्ष महाशक्ती बनला'
  • 'मिशन शक्तीअंतर्गत क्षेपणास्त्राच्या सहाय्याने उपग्रह पाडण्यात यश'
  • 'स्पेस पॉवर म्हणून जगात भारताचा गौरव'
  • 'भारतानं उपग्रह मिसाईलच्या सहाय्यानं पाडला'
  • 'अवघ्या ३ मिनिटांमध्ये उपग्रह पाडला'
  • 'डिआरडिओच्या शास्त्रज्ञानांना मोठं यश'
  • पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले डीआरडीओचे अभिनंदन 


हेही वाचा -

भारताची अंतराळ 'शक्ती', ३ मिनिटांत पाडला उपग्रह


पुढील बातमी
इतर बातम्या