भारताची अंतराळ 'शक्ती', ३ मिनिटांत पाडला उपग्रह

अंतराळातील लाइव्ह सॅटेलाइट उद्धवस्त करणारा भारत हा अमेरिका, रशिया आणि चीननंतरचा चौथा देश बनला असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली. देशाला संबोधित करताना ते बोलत होते.

SHARE

''भारत अंतराळातील महाशक्ती बनला आहे, भारताने आज अंतराळात एक लाइव्ह सॅटेलाइट उदध्वस्त केलं, अशी क्षमता प्राप्त करणारा भारत हा अमेरिका, रशिया आणि चीननंतरचा चौथा देश बनला'' असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली. देशाला संबोधित करताना ते बोलत होते. बुधवारी सकाळी त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून देशाला संबोधित करणार असल्याची माहिती दिली होती. त्यानंतर लोकसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू असतानाच मोदी नेमकं काय बोलणार? यावरून राजकीय वर्तुळात अनेक तर्क वितर्कांना उधाण आलं होत. 


 

अंतराळातील महाशक्ती

पंतप्रधान मोदी १२.३० वाजेच्या सुमारास देशवासीयांना संबोधित करण्यासाठी कॅमेऱ्यासमोर आले. त्यानंतर मिशन शक्तीअंतर्गत क्षेपणास्त्राच्या सहाय्याने उपग्रह पाडण्यात भारताला यश मिळाल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच या अभियानाच्या यशस्वीतेमुळे भारत अंतराळातील महाशक्ती बनल्याचंही मोदी यावेळी म्हणाले. जवळपास १५ मिनिटं त्यांनी भाषण केलं. 

 

३०० किमीवरील उपग्रह

भारताच्या ए-सॅट क्षेपणास्त्रानं अंतराळात ३०० किलोमीटर उंचीवरील LEO (Low Earth Orbit) कार्यरत उपग्रह अवघ्या ३ मिनिटांत पाडला. ही संरक्षण संशोधन आणि विकास संस्थे (DRDO)तील शास्त्रज्ञांची सर्वोत्तम कामगिरी असल्याचं त्यांनी नमूद केलं. भारताने ही मोहीम कोणत्याही देशाविरुद्ध राबवली नाही. तर देशातील नागरीक देशाची सुरक्षा यासाठी ही मोहीम राबवण्यात आली.


युद्धाचा हेतू नाही

आम्हाला जगात शांतता कायम ठेवायची आहे, आमचा युद्धाचा हेतू नाही. यातून भारताने अंतराळ क्षेत्रात मोठी झेप असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. कृषी संरक्षण मनोरंजन, हवामान,शिक्षण, वैद्यकीय अशा विविध क्षेत्रांत आपल्याला उपग्रहांचा फायदा मिळत आहे, असंही ते म्हणाले.हेही वाचा -

पंतप्रधान मोदींनी केली 'ही' मोठी घोषणासंबंधित विषय
ताज्या बातम्या