विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी १२ अर्ज

विधानपरिषद निवडणूकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी गुरूवारी भाजपाकडून पृथ्वीराज देशमुख यांनी अर्ज दाखल केल्याने निवडणुकीत रंगत वाढली आहे. ११ जागांसाठी १२ अर्ज आल्याने ही निवडणूक बिनविरोध होणार की नाही हे ९ जुलैला समजेल. 

शुक्रवारी अर्जांची छाननी करण्यात येईल. ९ जुलै उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे.  या दिवशी एका उमेदवाराने उमेदवारी मागे घेतल्यास निवडणूक बिनविरोध होईल.

भाजपाचे ६ उमेदवार

या निवडणूकीसाठी १६ जुलैला मतदान होणार आहे. भाजपाकडून पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर, विजय गिरकर, राम पाटील रातोळीकर, रमेश पाटील आणि निलय नाईक यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. तर पृथ्वीराज देशमुख यांच्या रूपाने भाजपाचे सहा उमेदवार झाले अाहेत.  

शिवसेनेकडून अॅड. अनिल परब आणि मनिषा कायंदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला अाहे. तर काँग्रेसकडून शरद रणपिसे आणि वजाहत मिर्झा, राष्ट्रवादीकडून बाबाजानी दुर्राणी तर शेकापचे जयंत पाटील यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. 


हेही वाचा - 

कैद्याला मारहाण करुन विष्ठा खायला लावली- रमेश कदम

सिडको जमीन घोटाळ्याची न्यायालयीन चौकशी करणार- मुख्यमंत्री


पुढील बातमी
इतर बातम्या