Advertisement

सिडको जमीन घोटाळ्याची न्यायालयीन चौकशी करणार- मुख्यमंत्री

सिडको भूखंड घोटाळ्यावरुन आक्रमक होत मुख्यमंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून त्वरीत राजीनामा द्यावा, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. तर पृथ्वीराज चव्हाण यांनी घोटाळ्याची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी केली.

सिडको जमीन घोटाळ्याची न्यायालयीन चौकशी करणार- मुख्यमंत्री
SHARES

नवी मुंबईतील कथित सिडको जमीन घोटाळ्याची न्यायालयीन चौकशी करण्याचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरूवारी विधानसभेत दिलं. नागपूर पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विरोधकांनी मुख्यमंत्र्यांवर सिडको जमीन घोटाळ्यावरून गंभीर आरोप केले. त्यावर खुलासा करताना मुख्यमंत्र्यांनी सर्व आरोपांचं खंडन केलं.


विरोधक आक्रमक

सिडको भूखंड घोटाळ्यावरुन आक्रमक होत मुख्यमंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून त्वरीत राजीनामा द्यावा, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. तर पृथ्वीराज चव्हाण यांनी घोटाळ्याची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी केली.


२०० हेक्टर जमिनीचं वाटप

या आरोपांना उत्तर देताना आपण सिडको जमीन घोटाळा प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करूच, पण त्याचसोबत आघाडी सरकारने याचपद्धतीने वाटप केलेल्या २०० हेक्टर जमिनीच्या प्रकरणांचीही न्यायालयीन चौकशी करू, असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.


चव्हाण मुख्यमंत्री असताना...

पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना प्रकल्पग्रस्तांसहित विविध श्रेणीअंतर्गत ६६० हेक्टर जमिनीचं वाटप करण्यात आलं होतं. त्यांच्याच काळात जमीन वाटपाचे अधिकार अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले होते. जमीन वाटप हा जिल्हाधिकाऱ्यांच्या अखत्यारितील विषय आहे. त्याचा मंत्र्यांशी किंवा मंत्रालयाशी काहीही संबंध नाही. त्यामुळे कुणाच्या सांगण्यावरून आरोप करू नका, असा सल्ला मुख्यमंत्र्यांनी पृथ्वीराज चव्हाण यांना दिला.


काय होता काँग्रेसचा आरोप?

नवी मुंबईतील सिडकोच्या २४ एकर जमिनीच्या विक्री व्यवहारात मोठा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप करून काँग्रेसने खळबळ उडवून दिली होती. सिडकोच्या जमिनीची किंमत १७६७ कोटी रुपये असताना ती अवघ्या ३ कोटी रुपयांना बांधकाम व्यावसायिक मनिष भतिजा आणि संजय भालेराव यांना विकल्याचा दावा काँग्रेस नेत्यांनी केला होता.



हेही वाचा-

मुख्यमंत्र्यांच्या वरदहस्ताने १७६७ कोटींची जमीन ३ कोटींना, काँग्रेसचा खळबळजनक अारोप

लाड यांनी ठोकला काँग्रेस नेत्यांवर ५०० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा