'राज ठाकरेंनी भरावा मनोरंजन टॅक्स' - विनोद तावडे

लोकसभा निवडणूकीत महायुती दणदणीत विजयी झाल्यामुळं देशात पुन्हा मोदी सरकारचं आलं आहे. एकट्या भाजपनं ३०० चा आकडा पार केला आहे. आशातच भाजपच्या नेत्यानी विरोधी पक्षांवर निशाणा साधण्यास सुरूवात केली आहे. शिक्षणमंत्री आणि भाजप नेता विनोद तावडे यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. गुरूवारी मतमोजणी झाल्यानंतर विनोद तावडे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतान, 'राज ठाकरे यांनी मनोरंजन टॅक्स भरावा पाहिजे', असं म्हटलं आहे. 

मोदी व शहाविरोधात प्रचारसभा

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये नरेंद्र मोदी-अमित शहा यांच्याविरोधात प्रचारसभा घेतल्या होत्या. या सभांमध्ये राज यांनी 'लाव रे तो व्हिडीओ' असं म्हणत वेगवेगळे व्हिडीओ दाखवत मोदी व शहा यांना निवडणून आणू नका असं म्हटलं होतं. तसंच, भाजपही त्यांच्या या सभांवर सुरूवातीपासूनच निशाणा साधुन होती. भाजपनं निवडणूक आयोगाकडं याबाबत तक्रार दाखल करत 'राज ठाकरेंच्या सभांचा खर्च किती, त्याचा हिशोब काय ? ',असं विचारलं होतं

भरघोस मतांनी विजयी

गोरगावमधील नेस्को ग्राउंड मतमोजणी केंद्रावर शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना, राज ठाकरेंवर निशाणा साधला. 'राज ठाकरेच्या आव्हानांना राज्याचा जनतेनं साफ नकार दिला आहे. राज ठाकरेंनी लाख अपील केल्यानंतर देखील जनतेनं भाजप-शिवसेनेला भरघोस मतांनी विजयी केलं आहे', असं म्हटलं. तसंच, 'राज ठाकरेंनी लोकांच मनोरंजन केलं आहे, त्यामुळं त्यांनी सरकारला मनोरंजन टॅक्स दिला पाहिजे', असंही म्हटलं आहे.


हेही वाचा -

मुंबईतील भेंडीबाजार परिसरात भीषण आग

जगभरातील नेत्यांनी दिल्या नरेंद्र मोदींना शुभेच्छा


पुढील बातमी
इतर बातम्या