अण्णा हजारे यांनी उपोषण सोडावं - राज ठाकरे

देशात लोकपाल कायद्याची अंमलबाजावणी व्हावी, यासाठी उपोषणाला बसलेले ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी सोमवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे राळेगणसिद्धीत आले होते. त्यावेळी राज यांनी निर्दयी सरकारसाठी आपण जिवाची बाजी लावू नये, उपोषण सोडून राजवट गाडून टाकण्यासाठी काय करता येईल ते करावं, अशी विनंती अण्णांना केली.

खोटारडं सरकार

देशात लोकपाल कायदा अंमलात यावा यासाठी राळेगणसिद्धीत समाजसेवक आण्णा हजारे हे मागील पाच दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. उपोषणामुळे दिवसेंदिवस आण्णाची प्रकृती ढासळत असल्याने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमवारी राळेगणसिद्धीत जाऊन अण्णांची भेट घेतली. त्यावेळी राज यांनी नरेंद्र मोदी सरकार हे आजवरचं सर्वात खोटारडं सरकार आहे. अशा निर्दयी सरकारसाठी आण्णांनी आपल्या जीवाची बाजी लावू नये, अण्णा यांनी उपोषण सोडून राजवट गाडून टाकण्यासाठी काय करता येईल ते करावं, असं आवाहन राज यांनी उपस्थितांसमोर केलं. 

केजरीवालांवर टिका 

यावेळी अण्णांच्या आंदोलनातून राजकारणात आलेल्या दिल्लीच्या मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर राज यांनी टीका केली.अण्णांची प्रकृती खालावत असताना केजरीवाल यांनी त्यांची विचारपूस करण्यासाठी यायला हवे होते. याच अण्णांच्या आंदोलनामुळे केजरीवाल हे दिल्लीत मुख्यमंत्री झाले. त्या आधी केजरीवाल यांना कुणी ओळखत तरी होतं का? असा सवालही राज यांनी करत केजरीवाल यांच्यावर टिका केली. अण्णांच्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर करत, या आंदोलनातून नक्कीच चांगलं काही तरी घडेल अशी अपेक्षाही राज यांनी व्यक्त केली.


हेही वाचा - 

निवडणूकीच्या तोंडावर मोदींनी केलं मध्यमवर्गीयांना खुश, ५ लाखापर्यंतच उत्पन्न करमुक्त


पुढील बातमी
इतर बातम्या