1978 नंतर घेतला ऐतिहासिक निर्णय

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी 500 आणि 1000 च्या नोटा व्यवहारातून बंद करण्याचा निर्णय घेतला. 1978 मध्येही काळ्या पैशावर आळा घालण्यासाठी असा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर आता मोदी सरकारनं 1000 आणि 500 च्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेतला. 1978 मध्ये 1000, 5000 आणि 10,000 रुपयांच्या नोटा व्यवहारातून बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. हा निर्णय हाय डेमोमिनेशन बँक कायद्यानुसार लागू करण्यात आलं होतं. या कायद्यानुसार 16 जानेवारी 1978 नंतर या नोटा वापरातून बंद करण्यात आल्या होत्या. मोठा व्यवहार करण्यास ही पाबंदी लावण्यात आली होती. त्यानंतर मोठ्या संस्थाना, बँकांना रिझर्व्ह बँकेत जाऊन नोटांविषयी माहिती द्यायची होती आणि 9 दिवसांत नोटा बँकेत जमा करण्याची मुदत देण्यात आली होती.

पुढील बातमी
इतर बातम्या