राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी राज्यपालांच्या अभिभाषणानंतर विरोधकांच्या प्रश्नांना उत्तर देताना हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावरून भाजपचे कान टोचण्याचा प्रयत्न केला. त्यात बाबरी मशीद पतन व राम मंदिरच्या मुद्द्यावर बोलताना शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी घेतलेल्या भूमिकेचाही पुनरूच्चार केला. त्यावर संताप व्यक्त करताना उद्धव ठाकरे बहुधा मुख्यमंत्री असल्याचं विसरलेत, असं वक्तव्य समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांनी केलं.
“उद्धव ठाकरे विसरले आहेत की ते मुख्यमंत्री आहेत. बाबरी मशीदीत मूर्ती ठेवणं आणि मशीद पाडणे हे गुन्हेगारी कृत्य असल्याचं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे. जर मुख्यमंत्री गुन्हेगारी कृत्य स्वीकरत असतील तर हे दुर्दैवी आहे.” असं म्हणत अबू आझमी (abu azmi) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विधानावर नाराजी व्यक्त केली.
सोबतच, “हे सरकार किमान समान कार्यक्रमावर बनवण्यात आलं आहे. मात्र इथं मंदिरं व मशीदींवर चर्चा होत आहे. तुम्ही भविष्यात कशा पद्धतीने पुढे जाणार यावर तुम्हाला विचार करण्याची गरज आहे, असं मला राष्ट्रवादी आणि काँग्रेसला सांगावं वाटतंय. एवढंच नाही, तर राज्यात सीएए-एनआरसी लागू करणार नाही, असं मुख्यमंत्र्यांचं म्हणणं आहे. मुस्लिमांना ५ टक्के आरक्षण देण्याची काँग्रेस-राष्ट्रवादीची भूमिका आहे. आता ते सत्तेत असूनही त्याची अंमलबजावणी होत नाहीय. मुस्लीम मंत्र्यांना थोडी लाज वाटायला हवी आणि त्यांनी राजीनामा द्यावा.”, असं परखड मतही अबू आझमी यांनी व्यक्त केलं.
हेही वाचा- “उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे राहुल गांधी”
म्हणजे बाबरी पाडली कुणी? आम्ही नाही पाडली. ६ वर्षे केंद्रात सत्ता असताना देखील, राम मंदिरासाठी कायदा करा, कायदा केला नाही. राम मंदिराचा निर्णय कुणी दिला, सर्वोच्च न्यायालयाने दिला आणि आता राम मंदिरासाठी घराघरात जाऊन पैसे मागत आहेत. म्हणजे पैसे दिले कोणी? जनतेने दिले, आमचं नाव आलं पाहिजे.” असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी भाजपवर टीका केली होती.
(samajwadi party leader abu azmi angry on maharashtra cm uddhav thackeray on his babri masjid statement)