Advertisement

जळगाव वसतिगृह महिला शोषण प्रकरणी गृहमंत्र्यांची पोलिसांना क्लीन चिट

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी निवेदन सादर केलं असून जळगाव वसतिगृह प्रकरणी पोलिसांवरील आरोपात तथ्य नसल्यास म्हणत क्लीन चिट दिली आहे.

जळगाव वसतिगृह महिला शोषण प्रकरणी गृहमंत्र्यांची पोलिसांना क्लीन चिट
SHARES

जळगावमधील शासकीय आशादीप महिला वसतिगृहात तरुणींना कपडे काढून नृत्य करण्यास भाग पाडण्यात आल्याचं वृत्त समोर आल्याने राज्यभरात खळबळ उडाली होती. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात बुधवारी हा मुद्दा चांगलाच गाजला. त्यावर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख (anil deshmukh) यांनी निवेदन सादर केलं असून पोलिसांवरील आरोपात तथ्य नसल्यास म्हणत क्लीन चिट दिली आहे.

“आशादीप महिला वसतिगृहात काही सांस्कृतिक कार्यक्रम ठेवण्यात आले होते. त्यात गरबा, कविता वाचन, गाण्याचा कार्यक्रम होता. महिला अधिकाऱ्यांनी तिथं भेट देऊन सर्व कामकाज पाहिलं, महिलांशी चर्चा केली. महिलांचं वसतिगृह असल्याने एकही पोलीस कर्मचारी आत जाऊ शकत नाही. तेथील रजिस्टरमध्ये कोणी अधिकारी कधी आतमध्ये आल्याची नोंद नाही. त्यामुळे अशा पद्धतीने व्हिडिओ झाला, नग्न व्हायला लावलं आणि पोलिसांनी व्हिडिओ काढला या आरोपांमध्ये काही तथ्य नाही. तशा पद्धतीचा अहवाल महिला अधिकाऱ्यांनी दिला असून तो मी पटलावर ठेवतो,” असं अनिल देशमुख यांनी सांगितलं.

हेही वाचा- “सुधीरभाऊंचं भाषण ऐकताना नटसम्राट बघितल्याचा भास झाला!”, उद्धव ठाकरेंचा टोमणा

सोबतच संबंधित ठिकाणी केवळ १७ महिला होता. त्यामुळे सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यास परवानगीची आवश्यकता नाही. १७ महिलांना कविता किंवा गाणी गाण्याचं बंधन नाही. १७ पैकी ५ मुली १८ वर्षांच्या खालील असून त्या गर्भवती असल्याने बालसुधारगृहात पाठवण्यात आल्याच्या बातमीत देखील तथ्य नाही. हे मुलींचं नाही तर महिलांचं वसतिगृह आहे. त्यामुळे ज्या वृत्तपत्राने ही बातमी दिली आहे, त्यांच्यावर कारवाई करु, असं अनिल देशमुख यांनी सांगितलं.

जळगावमधील शासकीय आशादीप महिला वसतिगृहात तरुणींना कपडे काढून नृत्य करण्यास भाग पाडण्यात आलं असून या प्रकरणात पोलीस कर्मचारी आणि वसतिगृहाबाहेरील काही पुरुष सहभागी असल्याचा आरोप करण्यात आला होता. अधिवेशनात या प्रकरणावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी झालेली पहायला मिळाली. त्यानंतर गृहमंत्र्यांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले होते. 

(maharashtra home minister anil deshmukh gives clean chit to police on jalgaon ashadeep women hostel issue)

हेही वाचा-  केंद्र सरकारविरोधात बोलणाऱ्यांवरच छापे- नवाब मलिक

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा