Advertisement

“सुधीरभाऊंचं भाषण ऐकताना नटसम्राट बघितल्याचा भास झाला!”, उद्धव ठाकरेंचा टोमणा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील विरोधकांना खोचक टोमणे मारत खरपूस समाचार घेतला. त्यात “सुधीर मुनगंटीवारांचं भाषण पाहताना ‘नटसम्राट’ बघत असल्याचा भास झाला”, अशा शब्दांत टोला लगावला.

“सुधीरभाऊंचं भाषण ऐकताना नटसम्राट बघितल्याचा भास झाला!”, उद्धव ठाकरेंचा टोमणा
SHARES

जळगाव महिला वसतिगृहातील प्रकरणावरून बुधवारी भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली होती. यानंतर विरोधकांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांना उत्तर देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी देखील विरोधकांना खोचक टोमणे मारत खरपूस समाचार घेतला. त्यात “सुधीर मुनगंटीवारांचं भाषण पाहताना ‘नटसम्राट’ बघत असल्याचा भास झाला”, अशा शब्दांत टोला लगावला.

कुणी किंमत देता का किंमत

राज्यपालांनी केलेल्या अभिभाषणाच्या अभिनंदन प्रस्तावावर बोलताना उद्धव ठाकरेंनी सरकारविरोधात आक्रमक झालेल्या सुधीर मुनगंटीवार यांचा समाचार घेतला उद्धव ठाकरे म्हणाले, राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा सुरू असताना काही वेळ मी केबिनमध्ये गेलो होते. तिथून कामकाज बघत असताना सुधीर मुनगंटीवार बोलत होते. मुनगंटीवार बोलत असताना मी नटसम्राट बघतोय असा भास झाला. मात्र त्यांच्या भाषणाचा शेवट केविलवाणा वाटला. कुणी किंमत देता का किंमत... सुधीरजी, काय तुमचा आवेश... चंद्रकांतदादा आणि देवेंद्रजींना भीती वाटायला लागली.  कारण ज्या तडफेने तुम्ही बोलत होता, ते छान होतं.

हेही वाचा- बावनकुळे चीनचे समर्थक आहेत का? - सचिन सावंत

कलाकार कधी लपून राहत नाही

बाकी तुमचंही माझ्यासारखं झालंय. तुमच्यातील कलागुणांना वाव मिळत नाही. मी फोटोग्राफर आहे. गडकिल्ल्यांचे फोटो काढले आहेत. पण सध्या ते करता येत नाही. कलाकार हा कधी लपून राहत नाही. जिथे संधी मिळेल, तिथे कला उचंबळून येते. तुम्हीही तुमच्यातला कलाकार मारू नका, असा चिमटाही उद्धव ठाकरेंनी काढला. 

जळगाव येथील आशादीप महिला वसतिगृहात काही पोलीस कर्मचारी व इतर पुरूषांकडून मुलींना कपडे काढून नाच करायला भाग पाडल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. हा मुद्दा सुधीर मुनगंटीवार (sudhir mungantiwar) यांनी विधानसभेत आक्रमकपणे उचलून धरला आणि सरकारवर टीका केली.

हा गंभीर विषय आहे. मी संविधानाचं पालन करणारा व्यक्ती आहे. पण राज्यात आमच्या आया बहिणींना नग्न करून नाचवलं जात आहे. यासंबंधीचे सर्व व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असताना देखील तुम्ही नोंद घेऊ असं सांगता. ही थट्टा पाहता राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याशिवाय पर्याय नाही. या सरकारवर राष्ट्रपती राजवट लागू करण्याची वेळ आली आहे, असं मुनगंटीवार यांनी म्हटलं. 

(cm uddhav thackeray criticised sudhir mungantiwar in maharashtra assembly)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा