देशात कुणाचं सरकार येणार? भाजपा की काँग्रेस?

एका बाजूला लोकसभेच्या मतमोजणीला सुरूवात झालेली असताना एक्झिट पोल्सप्रमाणे मुंबईतील सट्टा बाजारानेही भाजपाला सर्वाधिक जागा मिळतील, असा अंदाज वर्तवला आहे.  सट्टा बाजाराच्या मते भलेही भाजपाला एकहाती बहुमत मिळणार नसलं, तरी भाजपाचं केंद्रात सहकारी पक्षासोबत सत्ता स्थापना करेल. तर दुसऱ्या बाजूला काँग्रेस १००चा आकडाही गाठू शकणार नाही.

कुणाला किती जागा मिळणार?

सट्टा बाजाराच्या मते १७ व्या लोकसभा निवडणुकीत २३८-२४१ जागा मिळतील. तर काँग्रेसला ७८ ते ८१ च्या दरम्यान जागा मिळतील. त्यामुळे भाजपाला मित्रपक्षांना सोबत घेऊनच केंद्रात सरकार स्थापन करावं लागतं. 

नरेंद्र मोदी, अमेठीवर सट्टा

सट्टा बाजारात नरेंद्र मोदी पंतप्रधान होतील की नाही यावरही जोरदार सट्टा लागला आहे. सोबतच काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी  अमेठीत जिंकतील की हारतील, राज्यात भाजपाला किती जागा मिळतील? यावरही सट्टा लावण्यात आला आहे. सट्टेबाजांच्या मते भाजपा मित्रपक्षांच्या साथीने पुन्हा एकदा ३०० चा जादुई आकडा पार करू शकते.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपा ४३५ जागांवर लढत असून इतर जागा भाजपाने मित्र पक्षाला दिल्या आहेत. तर काँग्रेस देशभरात एकूण ४२० जागांवर लढत आहे.


 हेही वाचा-

मुंबईत कोण बाजी मारणार?


पुढील बातमी
इतर बातम्या