Advertisement

मुंबईत कोण बाजी मारणार?

मुंबईतील ६ लोकसभा मतदारसंघातील मतांची मोजणी ३ मतमोजणी केंद्रावर करण्यात येणार आहे. यंदा मतमोजणीला ४ ते ५ तासा अधिकचा उशीर होईल, असं निवडणूक अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे. काही ठिकाणी तर निकाल हाती येण्यास शुक्रवारची पहाट होईल, असाही अंदाज लावला जात आहे.

मुंबईत कोण बाजी मारणार?
SHARES

लोकसभा निवडणुकीचे निकाल गुरूवार २३ मे रोजी हाती येणार आहेत. त्यावरूनच केंद्रात कुठल्या पक्षाचं सरकार येईल हे ठरणार आहे. सकाळी ८ वाजेपासून मतमोजणीला प्रत्यक्षात सुरूवात होणार असली, तरी निवडणूक अधिकारी, कर्मचारी सकाळी ६ वाजेपासूनच मतमोजी केंद्रावर कार्यरत होतील. प्रत्येक लोकसभा मतदारसंघात विविध फेऱ्यामध्ये मतमोजणी होणार आहे. तसंच प्रत्येक मतदार संघातील ५ मतदान केंद्रावरील ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट पावत्यांची मोजणीही होणार आहे. त्यामुळे यंदा मतमोजणीला ४ ते ५ तासा अधिकचा उशीर होईल, असं निवडणूक अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे. काही ठिकाणी तर निकाल हाती येण्यास शुक्रवारची पहाट होईल, असाही अंदाज लावला जात आहे.

मुंबईतील ६ लोकसभा मतदारसंघातील मतांची मोजणी ३ मतमोजणी केंद्रावर करण्यात येणार आहे. उत्तर मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई आणि उत्तर मध्य मतदारसंघाची मतमोजणी गोरगाव पूर्व येथील नेस्को ग्राऊंडमध्ये होणार आहे. दक्षिण मध्य आणि दक्षिण मुंबई मतदारसंघाची मतमोजणी शिवडी पूर्व येथील न्यू शिवडी वेअरहाऊसमध्ये होणार आहे. तर, उत्तर पूर्व मतदारसंघाची मतमोजणी विक्रोळी पूर्व येथील उदयांचल प्रायमरी शाळेमध्ये होणार आहे.


दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघ

या मतदारसंघात शिवसेनेचे अरविंद सावंत आणि काँग्रेसचे मिलिंद देवरा यांच्यात मुख्य लढत आहे. या मतदारसंघात वरळी, शिवडी, भायखळा, मलबार हिल, मुंबादेवी आणि कुलाबा या ६ विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. या मतदारसंघात मतमोजणीच्या १८ ते २२ फेऱ्या होऊन अंतिम निकाल लागेल.


दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ 

या मतदारसंघात शिवसेनेचे राहुल शेवाळे आणि काँग्रेसचे एकनाथ गायकडवाड यांच्यात मुख्य लढत आहे. या मतदारसंघात अणुशक्ती नगर, चेंबूर, धारावी, सायन कोळीवाडा, वडाळा आणि माहीम या ६ विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. या मतदासंघात मतमोजणीच्या १८ ते २१ फेऱ्या होऊन अंतिम निकाल लागेल.


उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ  

या मतदारसंघात भाजपाच्या पूमन महाजन आणि काँग्रेसच्या प्रिया दत्त यांच्यात मुख्य लढत आहे. या मतदारसंघात विलेपार्ले, चांदिवली, कुर्ला, कलिना, वांद्रे पूर्व आणि वांद्रे पश्चिम या ६ विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. या मतदारसंघात मतमोजणीच्या २० ते २५ फेऱ्या होऊन अंतिम निकाल लागेल.


उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघ

या मतदारसंघात शिवसेनेचे गजानन किर्तीकर आणि काँग्रेसचे संजय निरूपम यांच्यात मुख्य लढत आहे. या मतदारसंघात जोगेश्वरी पूर्व, दिंडोशी, गोरेगाव, वर्सोवा, अंधेरी पश्चिम आणि अंधेरी पूर्व या ६ विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. या मतदारसंघात मतमोजणीच्या १८ ते २५ फेऱ्या होऊन अंतिम निकाल लागेल. 


उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघ

या मतदारसंघात भाजपाचे गोपाळ शेट्टी आणि काँग्रेसच्या उर्मिला मातोंडकर यांच्यात मुख्य लढत आहे. या मतदारसंघात बोरीवली, दहिसर, मागाठणे, कांदिवली पूर्व, चारकोप आणि मालाड पश्चिम या ६ विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. या मतदारसंघात मतमोजणीच्या १८ ते २३ फेऱ्या होऊन अंतिम निकाल लागेल.


उत्तर पूर्व मुंबई लोकसभा मतदारसंघ

या मतदारसंघात भाजपाचे मनोज कोटक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय दिना पाटील यांच्या मुख्य लढत आहे. या मतदारसंघात मुलुंड, विक्रोळी, भांडुप पश्चिम, घाटकोपर पश्चिम, घाटकोपर पूर्व आणि मानखुर्द शिवाजी नगर या ६ विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. या मतदारसंघात मतमोजणीच्या १८ ते २४ फेऱ्या होऊन अंतिम निकाल लागेल.



हेही वाचा-

राष्ट्रवादीचे आमदार जयदत्त क्षीरसागर यांचा शिवसेनेत प्रवेश

मनोज कोटक होणार मुंबई भाजपा अध्यक्ष?



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा