Advertisement

मनोज कोटक होणार मुंबई भाजपा अध्यक्ष?

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मनोज कोटक यांना मुंबई भाजपा अध्यक्षपदी बसवण्यात येऊ शकतं. कोटक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय समजले जातात.

मनोज कोटक होणार मुंबई भाजपा अध्यक्ष?
SHARES

उत्तर पूर्व मुंबईतून लोकसभा निवडणूक लढवल्यानंतर आता भाजपाचे नेते मनोज कोटक यांच्यावर आणखी एक महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात येऊ शकते. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मनोज कोटक यांना मुंबई भाजपा अध्यक्षपदी बसवण्यात येऊ शकतं. कोटक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय समजले जातात. त्यामुळेच लोकसभा निवडणुकीदरम्यान किरीट सोमय्या यांचं तिकीट कापण्यात आल्यावर कोटक यांना संधी देण्यात आली होती.

मनोज कोटक सध्या मुंबई महापालिकेतील भाजपाचे गटनेते आहेत. विद्यमान मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांची दुसरी टर्म पुढील महिन्यात संपत आहेत. पक्षाच्या नियमानुसार कुठल्याही नेत्याला तिसऱ्यांदा अध्यक्ष करता येत नाही. त्यामुळे यंदा मुंबई भाजपाला नवीन अध्यक्ष मिळणार आहे. 

कोटक यांना लोकसभेचं तिकीट मिळवून देण्यात मुख्यमंत्र्यांचा महत्त्वाचा वाटा राहीला आहे. या आधीही कोटक यांना विधान परिषदेत पोहोचवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी दोनदा प्रयत्न केले होते. परंतु ते दोन्हीवेळा अयशस्वी राहीले. एवढंच नाही, तर कोटक यांनी भांडुप विधानसभा क्षेत्रातून निवडणूक देखील लढवली होती. परंतु त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.



हेही वाचा-

उद्धव, आदित्य स्नेहभोजनासाठी रवाना

'स्ट्रॉग रूम आणि मतमोजणी केंद्रांची सुरक्षा वाढवा'- मिलिंंद देवरा



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा