Advertisement

'स्ट्राँग रूम आणि मतमोजणी केंद्रांची सुरक्षा वाढवा'- मिलिंंद देवरा

मुंबईतील दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार मिलिंद देवरा यांनी इव्हीएमच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.

'स्ट्राँग रूम आणि मतमोजणी केंद्रांची सुरक्षा वाढवा'- मिलिंंद देवरा
SHARES

देशभरातील लोकसभा निवडणुकीचं मतदान झाल्यावर सर्वपक्षीय नेत्यांसह सामान्य नागरिकांचे लक्ष मतमोजणीकडं लागलं आहे. गुरूवार २३ मे रोजी मतांची मोजणी करण्यात येणार आहे. मात्र, काँग्रेससह सर्वच विरोधी पक्षांनी इव्हीएमच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यास सुरुवात केली आहे. मुंबईतील दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार मिलिंद देवरा यांनी इव्हीएमच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.


सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह

गुरुवारी होणाऱ्या मतमोजणीपूर्वी मिलिंद देवरा यांनी इव्हीएमच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. मिलिंद देवरा यांनी या संदर्भात राज्याच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना पत्र लिहिलं आहे. इव्हीएममध्ये फेरफार करता येऊ नयेत, यासाठी स्ट्राँग रूम आणि मतमोजणी केंद्रांवरील सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात यावी, अशी विनंती या पत्रामधून देवरा यांनी केली आहे.


अरविंद सावंत यांचं आव्हान

दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार मिलिंद देवरा यांच्यासमोर शिवसेनेचे अरविंद सावंत यांचं आव्हान आहे. २९ एप्रिल रोजी दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात चौथ्या टप्प्यामध्ये मतदान झाले होतं.



हेही वाचा -

'गंगा-जमुना' चित्रपटगृह लवकरच होणार जमीनदोस्त ?

एक्झिट पोल म्हणजे नौटंकी- शरद पवार



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा