Advertisement

'गंगा-जमुना' चित्रपटगृह लवकरच होणार जमीनदोस्त ?

मुंबईतील पहिलं-वहिलं जुळं थिएटर म्हणून ख्याती असलेलं ताडदेवमधील 'गंगा-जमुना' चित्रपटगृह लवकरच जमीनदोस्त होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

'गंगा-जमुना' चित्रपटगृह लवकरच होणार जमीनदोस्त ?
SHARES

मागील काही दिवसांपुर्वी जुहू येथील चंदन थिएटर आणि दादरमधील चित्रा थिएटर बंद करण्यात आले. अशातच आता मुंबईतील पहिलं-वहिलं जुळं थिएटर म्हणून ख्याती असलेलं ताडदेवमधील 'गंगा-जमुना' चित्रपटगृह लवकरच जमीनदोस्त होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या थिएटरबाबत मुंबई महापालिकेनं केलेल्या संरचनात्मक सर्वेक्षणात 'गंगा-जमुना' चित्रपटगृह अतिधोकादायक असल्याचं समोर आलं आहे.


अतिधोकादायक इमारत

मागील १५ वर्षांपासून 'गंगा-जमुना' चित्रपटगृह बंद अाहे. मात्र, ताडदेव सर्कल परिसराला आजही 'गंगा-जमुना' चित्रपटगृहानं ओळखलं जातं. परंतु, या चित्रपटगृहाची इमारत पालिकेनं अतिधोकादायक ठरवली आहे. ही इमारत तात्काळ पाडून टाकण्यासाठी पालिकेच्या विभाग कार्यालयामार्फत नोटीसही बजावण्यात आली आहे.


रौप्य महोत्सवी आठवडे

'गंगा-जमुना' चित्रपटगृहात सुरुवातील 'हरे रामा हरे कृष्णा' हा सुप्रसिद्ध चित्रपट प्रदर्शित करण्यात आला होता. त्यानंतर सुहाग, मिस्टर नटवरलाल, कालिचरण हे चित्रपट खूप गाजले. तसंच, गंगा जमुनामध्ये प्रदर्शित झालेल्या अनेक चित्रपटांनी रौप्य महोत्सवी आठवडे अनुभवले असून, काही चित्रपट ५० आठवड्यांहून अधिक काळ गाजले आहेत. जमुनामध्ये 'जान हाजीर है' हा चित्रपट तब्बल ७५ आठवडे चालला होता.


१५ वर्षे बंद

७०च्या दशकात मुंबईत मोठ्या चित्रपटगृहांच्या यादीत 'गंगा-जमुना'चा समावेश होता. २००८ साली या चित्रपटगृहाची पुनर्बांधणी करण्यात येणार होती. तसंच, पुनर्बांधणीसाठी जो आराखडा तयार करण्यात आला होता, त्याला पालिकेनं मंजुरी देखील दिली होती. मात्र, पुनर्बांधणीबाबत पुढं काहीच न झाल्यामुळं हा चित्रपटगृह गेली १५ वर्षे बंद आहे.



हेही वाचा -

काँग्रेसचा विधीमंडळ नेता कोण? राहुल गांधी घेणार अंतिम निर्णय

सेन्सेक्सची १० वर्षांतली ऐतिहासिक उसळी



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा