सेन्सेक्सची १० वर्षांतली ऐतिहासिक उसळी

सलग दुसऱ्या दिवसी देखील सेन्सेक्सनं ऐतिहासिक उच्चांक गाठला. सेन्सेक्सनं ३९,५५४.२८ चा पल्ला गाठला आहे.

SHARE

लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यातील मतदान रविवारी झाल्यानंतर एक्झिट पोलचे निकाल समोर येऊ लागले. यामध्ये देशात पुन्हा एकदा मोदी सरकार येण्याची शक्यता वर्तवण्यात आली. या अंदाजामुळे सोमवारी सकाळी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ११०० अंकानी वधारला. त्यानंतर सेन्सेक्सनं मंगळवारी ऐतिहासिक उच्चांक नोंदवत ३९,५५४.२८ चा पल्ला गाठला.

ऐतिहासिक उच्चांक

सोमवारी सेन्सेक्स ३९,३५२.६७ वर तर निफ्टी ११,८२८.२५ पर्यंत स्थिरावला होता. मंगळवारी शेअर बाजार सुरु होताच सेन्सेक्सनं १०४. ५८ अंकांची झेप घेत ३९, ४५७. २५ चा पल्ला गाठला. तसंच, निफ्टीनंही २८. ८० अंकांची उसळी घेत ११, ८५७. १० चा पल्ला गाठला. त्यानंतर तेजीच्या लाटेवर स्वार झालेल्या सेन्सेक्सनं ३९, ५५४. २८ हा ऐतिहासिक उच्चांक देखील गाठला.

डॉलरचं मूल्य स्थिर

डॉलरच्या तुलनेत रुपयाचं मूल्य सोमवारी एकाच व्यवहारात तब्बल ४९ पैशांनी झेपावत ६९. ७४ वर स्थिरावलं होतं. परंतु, मंगळवारी सकाळी सुद्धा रुपयाचं मूल्य ६९. ७४ वरच स्थिर होतं.हेही वाचा -

पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे आंदोलन मागे

आरे रोड येथील मिठी नदीवरून जाणारा पूल धोकादायकसंबंधित विषय
ताज्या बातम्या