पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे आंदोलन मागे

पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेत आरक्षणाच्या मुद्द्यावरून आझाद मैदानात आंदोलन करत असलेल्या मराठा विद्यार्थ्यांनी अखेर १५ दिवसांनी आंदोलन मागे घेतलं आहे

SHARE

पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेत आरक्षणाच्या मुद्द्यावरू आझाद मैदानात आंदोलन करत असलेल्या मराठा विद्यार्थ्यांनी अखेर १५ दिवसांनी आंदोलन मागे घेतलं आहे. वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेशात मराठा आरक्षणावरून निर्माण झालेला तिढा सोडविण्यासाठी राज्य सरकारनं शुक्रवारी अध्यादेश जारी केला होता. या अध्यादेश सोमवारी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी स्वाक्षरी केली. त्यामुळं विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतलं असून त्यांचा पदव्युत्तर प्रवेशाचा मार्ग आता मोकळा झाला आहे.


आंदोलन मागे

राज्यपालांनी अध्यादेशावर स्वाक्षरी केल्यानंतर मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त करत राज्य सरकारचं अभिनंदन करत अध्यादेशाचं स्वागत केलं. मात्र, अध्यादेश लागू होऊन राज्य सरकारच्या सीईटी सेलकडून प्रवेश पूर्ववत करण्यात येत नाहीत तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, अशी भूमिका विद्यार्थ्यांनी घेतली. मात्र, अध्यादेशावर सही झाल्यानंतर काल राज्य शासनाने सीईटीच्या अधिकृत वेबसाईटवर तशी नोटीस काढण्यात आली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतलं.


मंत्रिमंडळाची बैठक

शुक्रवारी निवडणूक आयोगाच्या परवानगीनुसार मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेश वादावर तोडगा काढण्यासाठी अध्यादेश काढण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती चंद्रकांत पाटील यांनी मंत्रीमंडळाच्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत दिली होती.हेही वाचा -

दर शनिवार व रविवारी रात्री बेस्टच्या सीएनजी बसची तपासणी

अभिनेता विवेक ओबेरॉयनं अखेर मागितली माफीसंबंधित विषय