Advertisement

दर शनिवार व रविवारी रात्री बेस्टच्या सीएनजी बसची तपासणी

बेस्ट प्रशासनानं नियमित तपासणीबरोबरच दर शनिवार व रविवारी रात्रीच्या वेळेत सर्व सीएनजी बसची तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे.

दर शनिवार व रविवारी रात्री बेस्टच्या सीएनजी बसची तपासणी
SHARES

काही दिवसांपूर्वी दिंडोशी येथे ‘बेस्ट’च्या सीएनजी बसला आग लागल्याची घटना घडली होती. सुदैवानं या आगीत मोठी दुर्घटना टळली असली तरी संपूर्ण बस जळाल्याने २५ लाखांचं नुकसान झालं. मात्र, या घटनेची  पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी बेस्ट प्रशासनानं खबरदारी म्हणून नियमित तपासणीबरोबरच दर शनिवार व रविवारी रात्रीच्या वेळेत सर्व सीएनजी बसची तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे.


गेज यंत्रणा बदलण्याचा निर्णय

या आगीसंदर्भातील सादर झालेल्या अहवालानुसार, बेस्टमधील सीएनजी गॅसचा दाब मोजणारी गेज यंत्रणा बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार, सुमारे १८८५ सीएनजीपैकी ८२८ गेज तात्काळ बदलण्यात येणार असून, दर आठवड्याला सीएनजी बसची नियमित पाहणी करण्यात येणार आहे.


बेस्टचं आर्थिक नुकसान

या घटनेत बस क्रमांक ६४६ गोरेगाव स्थानक पूर्व येथून नागरी निवारा परिषद येथे जाताना अचानक पेट घेतला होता. त्यावेळी या बसमधील ३ प्रवाशांना बेस्ट चालकानं व वाहकानं सुरक्षित बाहेर काढल्यामुळं मोठी दुर्घटना टळली. मात्र, आग लागल्यानं बस जळाली असून यामध्ये बेस्टचं आर्थिक नुकसान झालं आहे.


बसच्या टाकीत पूर्ण गॅस

या घटनेची चौकशी केली असता चौकशीत चालक आणि वाहकाची यामध्ये कोणतीही चूक नसल्याचं प्रशासनानं बेस्ट समितीला सादर केलेल्या अहवालात म्हटलं आहे. बस आगारातून बाहेर काढताना बसच्या टाकीत पूर्ण गॅस होता. कोणतीही गळती होत नव्हती. ही बस दिंडोशी आगार येथून गोरेगाव स्थानक पूर्व येथून पुन्हा नागरी निवारा परिषदेकडे जात असताना बसखालून आवाज आला व काही मिनिटांत बसनं पेट घेतला.



हेही वाचा -

आरे रोड येथील मिठी नदीवरून जाणारा पूल धोकादायक



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा