Advertisement

अभिनेता विवेक ओबेरॉयनं अखेर मागितली माफी

सोमवारी विवेकनं या सर्व प्रकरणावर आपलं मत व्यक्त केलं होतं. माफी मागण्यात काही अडचण नाही. पण मी काही चुकिचं केलं नाही, असं देखील स्पष्ट केलं होतं. पण मंगळवारी सकाळी ट्वीट करत त्यानं माफी मागितली

अभिनेता विवेक ओबेरॉयनं अखेर मागितली माफी
SHARES

एग्झिट पोल म्हणजे अंतिम निकाल नव्हे हे गंमतीशीरपणे सांगणारे सलमान खान, ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या मिम्सचा विवेक ओबेरॉयने फोटो पोस्ट केला होता. या फोटोमुळे विवेक ओबेरॉय चांगलाच अडचणीत आला. पण अखेर विवेक ओबेरॉयनं माफि मागत शेअर केलेलं ट्वीट डिलीट केलं आहे. सोमवारी विवेकनं या सर्व प्रकरणावर आपलं मत व्यक्त केलं होतं. माफी मागण्यात काही अडचण नाही. पण मी काही चुकिचं केलं नाही, असं देखील स्पष्ट केलं होतं. पण मंगळवारी सकाळी ट्वीट करत त्यानं माफी मागितली आणि ट्वीट डिलीट केलं.


सोमवारी विवेकनं दिलेलं स्पष्टीकरण

लोक मला माफी मागायला सांगत आहेत. माफी मागण्यात काही अडचण नाही, पण मला सांगा मी काय चुकीचे केलं आहे? जर मी काही चुकीचं केलं असेल तर माफी मागायला तयार आहे. मला वाटत नाही मी काही चुकीचे केलं आहे. एखाद्यानं मिम्स पोस्ट केला आणि त्यावर मी हसलो म्हणजे चूक केली का?

मला माहित नाही लोक याचा मोठा मुद्दा का करत आहेत. एकानं मला मिम्स पाठवले, ते पाहून मला हसायले आले. मी त्यावर खूप हसलो. ज्यानं मिम्स पाठवलं त्याच्या कल्पनाशक्तीला दाद दिली. जर कोणी तुमची टर उडवत असेल तर तूम्ही ते गांभिर्यानं घेऊ नये.

नेटकरांची विवेकवर नाराजी

सोशल मीडियावर हा फोटो रांचीच्या पवन सिंह नावाच्या व्यक्तीनं आपल्या ट्विटर हँडलवरून शेअर केला. विवेकनं त्याला रिट्वीट केलं आणि सोबत लिहीलं 'काय क्रिएटिव्हीटी आहे. यात कोणतंही पॉलिटीक्स नाहीये. हीच लाईफ आहे.' पण विवेकनं रिट्विट करताच अनेकांनी त्याच्या टीका केली. अनेकजण म्हणाले विवेकनं हे फक्त पब्लिसिटीसाठी केलं आहे. यातून स्पष्टपणे दिसतं की, त्याच्या मनात महिलांविषयी किती सन्मान आहे. अनेकांनी आपली मत व्यक्त करत विवेकवर नाराजी व्यक्त केली


महिला आयोगाची कारवाई

राष्ट्रवादी पक्षानं देखील विवेकच्या या रिट्वीटचा खरपूस समाचार घेतला आहे. त्याच्या या कृत्याची तक्रार राष्ट्रवादीनं महिला आयोगाकडे केली. महिला आयोगानं विवेकला नोटीस पाठवली आहे

काय होतं फोटोत?

विवेकनं शेअर केलेल्या फोटोत सलमान खान, ऐश्वर्या राय बच्चन, तो स्वतः आणि अभिषेक बच्चन आणि आराध्या दिसत आहे. सलमान आणि ऐश्वर्याचा फोटो सगळ्यात वर आहे. त्याला ओपिनियन पोल म्हणून दाखवण्यात आलं आहे. त्यानंतर एग्झिट पोल म्हणून स्वतः विवेक आणि एश्वर्याचा फोटो आहे तर रिझल्ट म्हणून अभिषेक-एश्वर्या आणि आराध्याचा फोटो आहे.


संबंधित विषय
Advertisement