म्हणून शरद पवारांनी केला नाशिकचा दौरा रद्द

अवकाळी पाऊस आणि गारपीठ यामुळे शेतकऱ्याचे झालेले नुकसान हे कधीही न भरून निघणारेच, याच शेतकऱ्याला धीर देण्याससाठी शरद पवार नाशिकला शेतकरी मेळाव्याला जाणार होते. मात्र नाशिकमध्ये कोरोनाचे चार संशयित आढळल्याने खबरदारी म्हणून पवारांनी नाशिकचा दौरा रद्द केला. 

 हेही वाचाः- रंगाचा बेरंग झाल्यास महिनाभर तुरुंगात जाल

इतर देशांप्रमाणे कोरोना वायरसचा प्रादुर्भाव भारतात दिवसेंदिवस वाढत आहे.  नाशिक जिल्ह्य़ात करोना व्हायरसचे चार संशयित सापडले होते. करोनाची लागण झालेल्या रुग्णांची देशातली संख्या ४३ च्या वर पोहचली आहे. शिंका , खोकला येणे यातून करोनाच्या विषाणूंचा प्रादुर्भाव होऊ  शकतो. गर्दीत त्याचा संसर्ग मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यातच अवकाळी पावसाने शेतकरी मेटाकुटीला आलाय, फळबागा आणि शेतीचे झालेले नुकसान यातून राज्यसरकारच्या नव नव्या योजनांकडे त्याचे लक्ष लागून राहिले आहे.  शेतकऱ्याचे हेच हित जाणून घेण्यासाठी राष्ट्रवादी काॅग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार नाशिकला शेतकरी मेळाव्याला जाणार होते. शेतकरी मेळावा म्हटले की तिथे गर्दी होणे हे स्वाभाविकच. त्यातही त्या मेळाव्यात शरद पवार येणार असतील तर गर्दी होणारच हे सगळे टाळण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून पवारांनी हा दौरा रद्दा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या पूर्वी फेब्रुवारी महिन्यात शरद पवार नाशिकचा दौरा अर्ध्यातून सोडून मुंबईला आले होते. पवारांनी तातडीने त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी घेतलेल्या बैठकीला ते गेले. 

पुढील बातमी
इतर बातम्या