सत्तासंघर्षाची लढाई पुढे ढकलली, 27 सप्टेंबरला पुढील सुनावणी

राज्याच्या सत्तासंघर्षाची सुनावणी आज पुढे ढकलली आहे. आता या प्रकरणी पुढील सुनावणी 27 सप्टेंबर रोजी सुप्रीम कोर्टात होणार आहे. सकाळी साडेदहा दरम्यान पाच न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर सुनावणीला सुरुवात झाली. त्यानंतर शिंदे गटाचे वकील नीरज किशन कौल यांनी कोर्टात युक्तीवा केला.

निवडणूक आयोगाच्या सुनावणीवरील स्थगिती उठवा, तसेच घटनापीठाने लवकर निर्णय घ्यावा, अशी मागणी कौल यांनी केली आहे.

शिवसेना कुणाची? याबाबत निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे गटाला कागदपत्रे सादर करण्यासाठी 23 सप्टेंबरपर्यंत मुदत दिली आहे. पण त्याआधीच सूनावणी सुरू व्हावी, असी विनंती शिंदे गटाने केली आहे. जवळपास आठ ते दहा दिवसांपासून सुप्रीम कोर्टामध्ये महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाबद्दल हालचाली झालेली नाही. याआधीचे सरन्यायाधीश एन.बी. रमना निवृत्त झाले आणि त्यानंतर ही सूनावणी कधी होणार या बाबत अनिश्चितता आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाकडून आता एक नवी चाल खेळली जात आहे.

न्या. धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायमूर्तींचे घटनापीठ महाराष्ट्राच्या प्रकरणाची सुनावणी करत आहे.

घटनापीठामध्ये कोणकोणते न्यायमूर्ती?

  • डी. एम. चंद्रचूड
  • एमआर शाह
  • कृष्ण मुरारी
  • हिमा कोहली
  • नरसिम्मन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे वकील नीरज कौल यांनी मंगळवारी सुप्रीम कोर्टात रीट प्रीटीशन दाखल केलं होतं. तातडीने सुनावणी घेण्याची मागणी करण्याची याचिका दाखल केल्यानंतर सुप्रीम कोर्टानं अखेर आजपासून सुनावणी पार पडेल.

वेगवेगळ्या परस्परविरोधी याचिकांमुळे महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा गुंता वाढलाय. आमदारांना अपात्र करण्याची मागणी, विधानसभा उपाध्यक्षांविरोधात अविश्वास प्रस्ताव, राज्यपालांची भूमिका, खरी शिवसेना कुणाची, विधानसभा अध्यक्षांची निवड, अशा वेगवेगळ्या मुद्द्यांमुळे महाराष्ट्राचा राजकारण ढवळून निघालं आहे. या सगळ्या विषयांवर एकत्रित सुनावणी आता घटनापीठापुढे घेतली जाणार आहे.

एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेची निवडणूक पार पडल्यानंतर बंडखोरी केली होती. त्यानंतर शिवसेनेत उभी फूट पडली. सध्याच्या घडीला एकनाथ शिंदे यांच्याकडे 40 आमदारांचा पाठिंबा आहे.

भाजपसोबत त्यांनी सत्ता स्थापन केली असून सध्या राज्यात फडवणीस-शिंदे सरकार काम करतंय. मात्र हे सरकारच बेकायदेशीर असल्याचा आरोप शिवसेना आणि उद्धव ठाकरेंच्या वतीने करण्यात आला होता. राजकीय भूकंपानंतर महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालं होतं.


हेही वाचा

अमित शहांचे आव्हान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, म्हणाले...

उद्धव ठाकरेंना मात देण्यासाठी एकनाथ शिंदे - राज ठाकरे एकत्र येणार?

पुढील बातमी
इतर बातम्या