Advertisement

उद्धव ठाकरेंना मात देण्यासाठी एकनाथ शिंदे - राज ठाकरे एकत्र येणार?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांच्या निवासस्थानी गणपती बाप्पाचे दर्शन घेतले होते.

उद्धव ठाकरेंना मात देण्यासाठी एकनाथ शिंदे - राज ठाकरे एकत्र येणार?
SHARES

आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात नवी राजकीय समीकरणे तयार होत आहेत. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंड करून सुमारे 50 आमदारांसह भाजपसोबत सरकार स्थापन केले. तर एकनाथ शिंदे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे हेही शिवसेनेला पालिकेतून हटवण्यासाठी एकत्र येण्याची चिन्ह आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांच्या निवासस्थानी गणपती बाप्पाचे दर्शन घेतले होते. तेव्हापासून आगामी पालिका निवडणुकीत शिवसेनेला सत्तेवरून हटवण्यासाठी एकनाथ शिंदे आणि मनसे एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सहकुटुंबासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी जाणार असल्याची माहिती आहे. गेल्या काही दिवसांपासून दोन्ही नेत्यांमधील भेटीगाठी वाढत असल्याने राजकीय वर्तुळातून तर्क वितर्क लावले जात आहेत. (Eknath Shinde News)

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही यावेळी भाजप कार्यकर्त्यांना पालिका निवडणुकीत पूर्ण ताकद लावण्याचे आवाहन केले आहे.

सोमवारी मुंबई दौऱ्यावर आलेल्या अमित शहा यांनीही भाजप कार्यकर्त्यांची भेट घेतली आणि पालिका निवडणुकीत 150 जागा जिंकण्याचे आश्वासन दिले. भाजप पुढील पालिका निवडणूक देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली लढणार असल्याचे अमित शहा यांनी स्पष्ट केले. पालिका निवडणुकीसाठी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचीही अनेकदा भेट झाली आहे.

सोमवारी मुंबई दौऱ्यावर आलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुंबईतील लालाबागमधील वेगवेगळ्या गणपती पंडालला भेट दिली आणि त्याच भाजप नेत्यांशी पालिका निवडणुकीबाबत चर्चा केली.

कार्यकर्त्यांना संबोधित करताना अमित शहा म्हणाले, "आम्ही उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाचे आश्वासन दिले नव्हते, उद्धव ठाकरेंनी आमची फसवणूक केली आहे, उद्धव ठाकरेंना जमीन आणायची आहे".

दरम्यान, राज्यातील सत्तांतरादरम्यान राज ठाकरे यांनी भाजपला आणि शिंदे गटाला मदत केली होती. राज्यसभा, विधानपरिषद किंवा विधानसभा अध्यक्ष असो शिंदे आणि राज ठाकरेंची जवळकी आपण गेल्या अनेक दिवसांपासून पाहतोय.

दसरा मेळाव्यात देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राज ठाकरे यांना विशेष अतिथी म्हणून बोलवण्याच्या चर्चा होत्या. मात्र काल मुख्यमंत्र्यांनी बोलताना सध्या तरी असा विचार नसल्याचे सांगितले. मात्र, दसरा मेळाव्यात हे दोघे नेते एकत्र येतील का? हे पाहावे लागेल.



हेही वाचा

1000 कोटींचा घोटाळा: आदित्य ठाकरेंच्या भूमिकेची चौकशी करा - किरीट सोमय्या

मुंबईत आम्हाला उपमहापौरपद मिळावे, नाहीतर : रामदास आठवले

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा