Advertisement

मुंबईत आम्हाला उपमहापौरपद मिळावे, नाहीतर : रामदास आठवले

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा हट्ट धरल्याने शिवसेनेत उभी फूट पडली आहे, असा आरोपही रामदास आठवले यांनी केला.

मुंबईत आम्हाला उपमहापौरपद मिळावे, नाहीतर : रामदास आठवले
SHARES

मुंबई मनपा निवडणुकीत बहुमताने युती विजयी होईल. भाजप आणि शिंदे गट यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहे. मुंबई मध्ये आम्हास पुण्याप्रमाणे उपमहापौरपद मिळावे आणि जर आरक्षण पडले तर महापौर पद मिळावे अशी मागणी रिपब्लिकन पक्ष प्रमुख रामदास आठवले यांनी केली आहे.

पहिला महापौर आमचा चंद्रकांत हांडोरे मुंबईत काँग्रेस सोबत युतीत असताना झाला होता. अनेक ठिकाणी आम्हास भरभरून यश मिळेल. आघाडी सरकार सत्तेतून गेल्याने लोक आनंदात आहेत, युतीचे सरकार पडणार आहे आणि अडीच वर्ष सरकार टिकेल. त्याचसोबत पुढील पाच वर्ष ही आम्ही सत्तेत येऊ असे मत केंद्रीय सामाजिक आणि न्याय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पक्ष प्रमुख रामदास आठवले यांनी मंगळवारी व्यक्त केले.

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा हट्ट धरल्याने शिवसेनेत उभी फूट पडली आहे. ज्यांनी सेना वाढवण्यास आयुष्भर काम केले त्यांना स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेण्याचा अधिकार आहे. मोठी आणि खरी शिवसेना ही एकनाथ शिंदे यांची आहे. ते सातत्याने चांगले काम करत असून त्यांचा कामाचा व्याप वाढत असल्याने उद्धव ठाकरे सध्या कुठे दिसत नाहीत.

शिंदे यांच्यासह इतर 16 आमदारांना न्यायालयात दिलासा मिळेल. बाहेरील व्हीपला काही अर्थ नाही त्यांना सर्वच्च न्यायालयात न्याय मिळेल आणि जे अधिकृत शिवसेना चिन्हे धनुष्यबाण आहे ते मिळू शकेल.

शिवसेनेत दोनच गट आहे मात्र आमच्यात अनेक गट पडलेले आहे. आमच्यात ऐक्य होत असेल तर मी त्यास तयार आहे. शिवसेनेची अवस्था आरपीआय सारखी करण्याची आमची तयारी आहे. शेकडो गटमुळे आमच्या समाजाची अवस्था क्षीण झाली आहे. आमचा सर्वात प्रभावशाली गट असूनही आमदार, खासदार निवडून आणण्याची ताकद अद्याप आमच्यात नाही, असंही ते म्हणाले.



हेही वाचा

भाजपचे 'मिशन मुंबई'

वेळ आली आहे उद्धव ठाकरेंना जागा दाखवली पाहिजे : अमित शाह

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा