ईडीच्या कार्यालयावर शिवसैनिकांनी लावलं भाजपा प्रदेश कार्यालयाचे पोस्टर

शिवसेना नेते संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीनं रविवारी समन्स बजावला. ईडीच्या या समन्सवरुन शिवसेना आणि भाजपा आमने-सामने आल्याचं चित्र दिसत आहे. या सर्व प्रकरणानंतर मुंबईतील ईडीच्या कार्यालयावर शिवसैनिकांनी भाजप प्रदेश कार्यालय असं बॅनर लावलं आहे.

महाविकास आघाडी सरकारचे (MVA Goverment) नेते आणि आमदारांना एकापाठोपाठ ईडीच्या (ED notice) नोटीस मिळत आहेत. यावरूनच शिवसैनिकांनी (Shivsena) थेट ईडीला लक्ष्य केलं आहे. मुंबईतल्या ईडिच्या कार्यालयावर भाजपचे बॅनर लावण्यात आले आहे.

शिवसैनिकांनी ईडीच्या कार्यालयाबाहेर लावलेल्या बॅनरमध्ये नावच बदलून टाकलं आहे. ईडीच्या कार्यालयावर हे 'भाजप प्रदेश कार्यालय'असं सांगत बॅनरच लावले आहे.

शिवसेना कार्यकर्त्यांनी ईडीच्या कार्यालयावर बॅनर लावल्यानंतर पोलिस अधिकारी या ठिकाणी पोहचले. पण, शिवसैनिकांनी त्यांना बॅनर काढू दिले नाही. तुम्हाला हवं तर तुम्ही मुंबई महानगरपालिकेला तक्रार करा, असं शिवसैनिकांनी पोलिसांना सांगितलं.

शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक आणि त्यांच्या कुटुंबीयाला ईडीनं नोटीस बजावली. त्यांची चौकशी सुरू आहे. त्यानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांनाही नोटीस पाठवण्यात आली.

दरम्यान, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन ईडी आणि भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. 'गेल्या दीड महिन्यांपासून ईडी आमच्याकडे पत्रव्यवहार करत आहे. त्यांना जी काही कागदपत्र हवी आहे, ती वेळोवेळी पुरवली जात आहे.

यापैकी कोणत्याही अशा पत्रात भाजपचे नेते जे पीएमसी घोटाळा, HDIL प्रकरणाची नावं घेत आहेत, त्याचा उल्लेख यात केलेला नाही. भाजपचे नेते माकडाप्रमाणे उड्या मारत आहेत. ईडी आणि भाजप नेत्यांची हातमिळवणी झाली आहे, असा आरोपही राऊत यांनी केला.

'ईडी आणि केंद्रीय यंत्रणा ताब्यात घेऊन सरकार पाडण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. प्रताप सरनाईक हे टोकण आहे. डिसेंबरपर्यंत भाजपची डेडलाईन होती. पण ते शक्य झाले नाही. त्यामुळे त्यांच्या कुटुंबाला त्रास देण्यासाठी ईडीकडून प्रयत्न सुरू आहे. बायकांच्या पदराच्या आड खेळी खेळीत आहे' असंही राऊत म्हणाले.


हेही वाचा

मी जर तोंड उघडलं तर भाजपच्या दिग्गज नेत्यांना देशाबाहेर जावं लागेल - संजय राऊत

नववर्ष स्वागतासाठी मनसेची मुख्यमंत्र्यांना 'ही' विनंती

पुढील बातमी
इतर बातम्या