Advertisement

भाजपच्या कार्यालयात माणूस पाठवलाय- संजय राऊत


भाजपच्या कार्यालयात माणूस पाठवलाय- संजय राऊत
SHARES

शिवसेना नेते खासदार संजय राऊत ईडीच्या रडारवर आले आहेत. संजय राऊत यांच्या पत्नीला पीएमसी बँक घोटाळ्याशी संबंधित एका प्रकरणात नोटीस बजावण्यात आली आहे. या संदर्भात ट्विटरवर एका गीताच्या ओळी टाकून प्रतिक्रिया दिल्यानंतर राऊत यांनी पुन्हा भाष्य केलं.

ईडीच्या नोटीस प्रकरणावर भूमिका मांडण्यासाठी संजय राऊत यांनी आज दुपारी शिवसेना भवन येथे पत्रकार परिषद बोलावली आहे.

'ईडीची नोटीस आल्याबाबत मी काहीही बोललेलो नाही. भारतीय जनता पक्षाचे लोकच याबाबत माहिती देत आहेत. रविवारपासून वाट पाहतोय पण अजूनही कोणीही आलेलं नाही. याविषयी भाजपच्या लोकांकडे जास्त माहिती आहे. त्यामुळं मी माझा माणूस भाजपच्या कार्यालयात पाठवलाय. कदाचित ईडीची नोटीस तिथं अडकली असेल,' अशा शब्दात संजय राऊत यांनी भाजपवर टीका केली आहे.

विधानसभा निवडणुकीच्या आधीपासूनच राज्यात ईडीच्या नोटिशीचं सत्र सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक, भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेले एकनाथ खडसे यांना ईडीनं आतापर्यंत नोटिसा बजावल्या आहेत. आता संजय राऊत यांच्या वर्षा राऊत यांना नोटीस बजावल्याचं समजतं.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा