महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 : दिंडोशी मतदारसंघ सुनील प्रभूंनी राखला

दिंडोशी (dindoshi) मतदारसंघ हा महाराष्ट्र (maharashtra) विधानसभेतील (vidha sabha elections) महत्त्वाचा मतदारसंघ आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 अंतर्गत दिंडोशी विधानसभा मतदारसंघातील मतमोजणीचा निकाल आता समोर आला आहे. निकालानुसार उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेचे (shiv sena ubt) सुनील प्रभू (sunil prabhu) विजयी (won) झाले आहेत.

उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेचे सुनील प्रभू यांनी शिंदे गटाच्या शिवसेनेचे संजय निरुपम (sanjay nirupam) यांचा दारूण पराभव केला. अटीतटीच्या ठरलेल्या या सामन्यात अखेर सुनील प्रभू यांनी बाजी मारली.

या जागेवर शिंदे गटाच्या शिवसेनेचे संजय निरुपम आणि उद्धव गटाच्या शिवसेनेचे सुनील प्रभू यांच्यात चुरशीची लढत होती. मात्र आता या निकालाचा दिंडोशीसह संपूर्ण मुंबईच्या राजकीय दिशेवर परिणाम होणार आहे.

दिंडोशी विधानसभा मतदारसंघ हा महाराष्ट्रातील मुंबई (mumbai) जिल्ह्यातील एक महत्त्वाचा विधानसभा मतदारसंघ आहे, जो नेहमीच राजकीयदृष्ट्या चर्चेत असतो. या भागात प्रामुख्याने मराठी, उत्तर भारतीय आणि मुस्लिम समाजाचे लोक राहतात.

2009 मध्ये या जागेवर काँग्रेसचे राजहंस सिंह विजयी झाले होते. पण 2014 च्या निवडणुकीत राजकीय समीकरणे बदलली आणि भाजप-शिवसेना युतीने या प्रदेशात आपली पकड मजबूत केली. यावेळी शिवसेनेचे सुनील प्रभू यांनी काँग्रेस उमेदवाराचा पराभव केला.

2019 मध्ये सुनील प्रभू पुन्हा एकदा शिवसेनेच्या तिकिटावर विजयी झाले होते. काँग्रेसचे राजहंस सिंग त्यांना आव्हान देऊ शकले नाहीत. विरोधी पक्षांनी युतीविरोधात जोरदार प्रचार केला असला तरी मतदारांचा पाठिंबा शिवसेना-भाजपकडे गेला होता.


हेही वाचा

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक : वरळीतून आदित्य ठाकरेंची बाजी

अमित ठाकरेंचा दारुण पराभव, राज ठाकरेंना धक्का

पुढील बातमी
इतर बातम्या