2024 च्या विधानसभा निवडणुकीचा (vidhan sabha elections) निकाल समोर आला आहे. यात वरळीचा (worli) मतदारसंघ हा चर्चेचा विषय ठरला होता. या मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेचे आदित्य ठाकरे (aditya thackeray), मनसेचे संदीप देशपांडे (sandeep deshpande) आणि एकनाथ शिंदे गटाचे मिलिंद देवरा (milind deora) अशी तिरंगी लढत रंगली होती.
मात्र आता समोर आलेल्या निकालातून ठाकरेंच्या शिवसेनेचे (shiv sena ubt) उमेदवार आणि उद्धव ठाकरेंचे सुपुत्र आदित्य ठाकरे विजयी (won) झाले आहेत. शिंदे गटाच्या मिलिंद देवरा यांना दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले असून त्यांचा दारूण पराभव झाला आहे.
सलग दुसऱ्यांदा वरळी मतदारसंघातून विजयी होत आदित्य ठाकरेंनी आपला गड शाबूत ठेवला आहे. वरळी विधानसभा मतदारसंघ हा महत्त्वाचा मतदारसंघ मानला जातो.
2019 मध्ये आदित्य ठाकरे या जागेवरून विजयी झाले होते. त्यावेळी त्यांनी शिवसेनेचे उमेदवार (candidate) म्हणून निवडणूक लढवली आणि त्यांना 89,248 मते मिळाली. तर दुसऱ्या क्रमांकावर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुरेश माने होते, त्यांना 21,821 मते मिळाली होती.
आदित्य ठाकरे जवळपास 67 हजार मतांनी विजयी झाले होते. 2024 च्या निवडणुकीत आदित्य ठाकरेंनी जवळजवळ 9 हजारांच्या मतांनी प्रतिस्पर्धींना मात दिली आहे. आदित्य ठाकरेंच्या विजयाने ठाकरेंच्या शिवसेना गटात जल्लोषाचे वातावरण आहे.
हेही वाचा