सुधीर मुनगंटीवर यांनी उडवली शिवसेनेची खिल्ली

मुख्यमंत्रिपदावरून शिवसेना - भाजपात रस्सीखेच चालू असल्याच्या पार्श्वभूमीवर भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी आता शिवसेनेची खिल्ली उडवली आहे. मुख्यमंत्रिपद शिवसैनिकालाच मिळणार आहे. कारण देवेंद्र फडणवीस हे स्वत:ला शिवसैनिकच मानतात. अशा शब्दात मुख्यमंत्रीपदाच्या शिवसेनेच्या मनसुब्यावर मुनगंटीवर यांनी टोलेबाजी केली. त्यांच्या या वक्तव्यामुळं भाजपा आणि शिवसेनेतील वाद वाढण्याचीमुख्यमंत्रीपद शिवसैनिकालाच मिळणार,  चिन्हे आहेत. 

विधानसभेचा निकाल लागून आठवडा झाला तरी अद्याप शिवसेना आणि भाजपामधील सत्तासंघर्ष अजून मिटलेला नाही. एकमेकांकडून होत असलेल्या वक्तव्यांमुळे महायुतीतील दरी चांगलीच वाढली आहे. शिवसेनेकडून खासदार संजय राऊत हे किल्ला लढवत आहेत. तर भाजपाकडून सुधीर मुनगंटीवर बोलत आहेत.

शिवसेनेला १३ मंत्रिपदे देऊ केल्याबाबत मुनगंटीवर म्हणाले की, मुख्यमंत्रिपद सोडून इतर सर्व गोष्टींबाबत आम्हाला अजून चर्चा करायची आहे. शिवसेनेला काय प्रस्ताव द्यायचा हेही ठरायचं आहे. पण १३ पेक्षा अधिक मंत्रिपदं मिळण्यासाठी शिवसेना खरोखरच पात्र आहे का, असा  प्रश्नही मुनगंटीवर यांनी उपस्थित केला. 


हेही वाचा -

ठरल्याप्रमाणे झालं तरच महायुतीचं सरकार - संजय राऊत


पुढील बातमी
इतर बातम्या