Advertisement

ठरल्याप्रमाणे झालं तरच महायुतीचं सरकार - संजय राऊत

महाराष्ट्राची कुंडली आम्हीच बनवणार. कुठले ग्रह कुठे ठेवायचे, कुठले तारे जमिनीवर आणायचे, कुठले चमकावायचे ती ताकत शिवसेनेमध्ये आहे.

ठरल्याप्रमाणे झालं तरच महायुतीचं सरकार - संजय राऊत
SHARES

भाजपाने शिवसेनेला महायुतीची सत्ता स्थापन करण्यासाठी पहिला प्रस्ताव पाठवला आहे. या पार्श्वभूमीवर सरकार स्थापनेची घाई करुन चालणार नाही. महाराष्ट्राच्या हिताचा विचार करुन काही निर्णय घ्यावे लागतील. त्यासाठी उद्धव ठाकरे समर्थ आहेत. जर ठरल्याप्रमाणे सगळं घडलं तर सरकार स्थिर असेल अशी प्रतिक्रिया शिवसेनेची खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. राज्यात पुन्हा महायुतीचंच सरकार येणार या देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेचंही राऊत यांनी स्वागत केलं. 

राऊत यांनी बुधवारी पत्रकार परिषदेला संबोधित केले. यावेळी ते म्हणाले की, महाराष्ट्राची कुंडली आम्हीच बनवणार. कुठले ग्रह कुठे ठेवायचे, कुठले तारे जमिनीवर आणामहाराष्ट्राची कुंडली आम्हीच बनवणार. कुठले ग्रह कुठे ठेवायचे, कुठले तारे जमिनीवर आणायचे, कुठले चमकावायचे ती ताकत शिवसेनेमध्ये आहे. यचे, कुठले चमकावायचे ती ताकत शिवसेनेमध्ये आहे. सध्या विधिमंडळ पक्षाच्या  बैठका सुरू आहेत. त्या संपू द्या. शिवसेनेला कोणतीही घाई नाही.  शांतपणाने, थंड डोक्याने महाराष्ट्राच्या हिताचा विचार करून पुढचे निर्णय घ्यावे लागणार आहेत आणि आम्ही ते निश्चितच घेऊ. 

उद्धव ठाकरे जो निर्णय घेतील व जो आदेश देतील त्याचे पालन करणारे आम्ही शिवसैनिक आहोत, असंही राऊत म्हणाले. युतीत राहण्यातच राज्याचं भलं आहे पण योग्य तो सन्मान राखला जावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. 



हेही वाचा -

भाजपाने शिवसेनेला दिला 'हा' प्रस्ताव

राष्ट्रवादीच्या विधीमंडळ नेतेपदी 'ह्या' नेत्याची निवड





संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा