EVM वर शाई फेकणाऱ्याला जामिन

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं मतदान सुरू असताना ईव्हीएम (EVM)चा विरोध करत ठाण्यातील मतदान केंद्रावर सुनील खांबे नावाच्या व्यक्तीने शाई फेकली. त्यानंतर खांबेला उपस्थित पोलिसांनी तत्काळ ताब्यात घेतलं. खांबेला न्यायालयासमोर हजर केलं असता न्यायालयाने त्याला जामिन दिला.  

ईव्हीएमला विरोध

सुनील खांबे बहुजन समाज पार्टीचा नेता असल्याचं म्हटलं जात आहे. महाराष्ट्रात ईव्हीएमच्या माध्यमातून मतदान होत असलं, तरी अनेकांचा ईव्हीएमला विरोध असल्याचं या घटनेवरून पुढं आलं आहे. मध्यंतरी विरोधी पक्षाने एकत्र येत ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याची विनंती निवडणूक आयोगाला केली होती. परंतु विरोधी पक्षाची मागणी निवडणूक आयोगाने फेटाळून लावली.   

नेमकं काय झालं?

सोमवारी मतदान सुरू असताना सुनील खांबे ठाणे शहरातील मतदान केंद्रावर आला. त्यानंतर त्याने एका निवडणूक आयोगाकडून शाईची बाटली हिसकावून घेत ईव्हीएम मशीनवर शाई फेकली आणि निषेधाच्या घोषणा दिल्या. यानंतर गोंधळ सुरू झाल्यावर पोलिसांनी खांबेला त्वरीत ताब्यात घेतलं. त्याच्यावर भादंवि कलम १८६, ४२७ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला. 


हेही वाचा-

ठाणे: EVM च्या विरोधात 'त्याने' चक्क मशीनवर फेकली शाई!

सिटी बँकेच्या खातेदारांचा मतदानावर बहिष्कार, 'हे' आहे त्यामागचं कारण


पुढील बातमी
इतर बातम्या