Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
51,79,929
Recovered:
45,41,391
Deaths:
77,191
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
40,162
1,717
Maharashtra
5,58,996
40,956

ठाणे: EVM च्या विरोधात 'त्याने' चक्क मशीनवर फेकली शाई!

मुंबईसहीत राज्यभरात काही तुरळक घटना वगळता अत्यंत शांततेने मतदान झालं. ठाण्यात मतदान सुरू असतानाच एका व्यक्तीने ‘ईव्हीएम’ (EVM) मशीन वर शाई फेकली.

ठाणे: EVM च्या विरोधात 'त्याने' चक्क मशीनवर फेकली शाई!
SHARES

मुंबईसहीत राज्यभरात काही तुरळक घटना वगळता अत्यंत शांततेने मतदान झालं. ठाण्यात मतदान सुरू असतानाच एका व्यक्तीने ‘ईव्हीएम’ (EVM) मशीन वर शाई फेकली. पोलिसांनी या व्यक्तीला तात्काळ ताब्यात घेतलं. या व्यक्तीचं नाव सुनिल खांबे असं असून तो  रिपब्लिकन पक्षाचा कार्यकर्ता असल्याचं म्हटलं जात आहे.  


नेमकं काय झालं?

सुनिल खांबे इतर मतदारांप्रमाणेच मतदानासाठी आला. मात्र, त्यांने अचानक निवडणूक कर्मचाऱ्यांकडील शाईची बॉटल हिसकावून घेत ती ईव्हीएम कक्षावर फेकली आणि ईव्हीएमविरोधी घोषणा द्यायला लागला. त्यामुळे काहीवेळ मतदान कर्मचारी देखील गोंधळले. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत खांबे यांना मतदान केंद्राबाहेर काढत ताब्यात घेतलं.

काय म्हणाला? 

ईव्हीएममुळे लोकशाही धोक्यात आली आहे. सत्ताधाऱ्यांनी ईव्हीएमच्या मदतीने विरोधी पक्षातील मित्रपक्षांना संपवलं आहे. मला फासावर लटकवलं तरी चालेल, पण मी ईव्हीएमचा विरोध करत राहणार. लोकशाही वाचवण्यासाठी सर्वांनी ईव्हीएमला विरोध करावा, अशा घोषणा त्याने दिल्या.


हेही वाचा-

राज्यात अनेक ठिकाणी ईव्हीएम बिघडल्या, मतदानाचा खोळंबा

सिटी बँकेच्या खातेदारांचा मतदानावर बहिष्कार, 'हे' आहे त्यामागचं कारणRead this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा