Advertisement

राज्यात अनेक ठिकाणी ईव्हीएम बिघडल्या, मतदानाचा खोळंबा

ईव्हीएम बिघाडाची काँग्रेसने गंभीर दखल घेतली आहे. काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे ६५ लेखी तक्रारी दाखल केल्या आहेत.

राज्यात अनेक ठिकाणी ईव्हीएम बिघडल्या, मतदानाचा खोळंबा
SHARES

राज्यात सकाळी सात वाजल्यापासून विधानसभा निवडणुकीसाठी मतदान सुरू झालं आहे. मात्र, अनेक ठिकाणी ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे मतदान काही काळ थांबवावं लागलं. तर काही ठिकाणी मतदान उशिराने सुरू झालं. ईव्हीएम बिघाडाची काँग्रेसने गंभीर दखल घेतली आहे. काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे ६५ लेखी तक्रारी दाखल केल्या आहेत.  

औरंगाबाद जिल्ह्यात पैठण तालुक्यातील टाकळी अंबड, वाहेगाव आणि वैजापूर तालुक्यातील हिंगोणी मतदान केंद्रावर मतदान सुरू झाल्यावर ईव्हीएममध्ये बिघाड झाला. त्यामुळे काही तास मतदान बंद दोतं. तर मतदान सुरू होण्यापूर्वीच सिंदखेड राजा मतदारसंघातीळ देऊळगाव राजा बुथ क्र. २०५ मधील ईव्हीएम बिघाड झाल्याचं आढळून आलं. त्यामुळे या केंद्रावर एक तास उशिराने मतदान सुरू झालं. हातकणंगले तालुक्यातील रुकडी गावातील मतदान केंद्रावर VVPAT मशीन काम करत नव्हती. त्यामुळे या केंद्रावरील मतदानही बंद पडले होते.

सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरमध्ये एका मतदान केंद्रावरील ईव्हीएम बंद पडले होते. इस्लामपूर मतदारसंघातील साखराळे गावातील मतदान केंद्र क्रमांक ६३ वर देखील ईव्हीएममध्ये बिघाड झाला. चाळीसगावातील वलठान येथील मतदान केंद्र क्रमांक ३१० मधील ईव्हीएम बंद पडले होते. वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर तालुक्यात मोहगाव येथील मतदान केंद्रावर ईव्हीएम मशिन बंद पडले होते. यामुळे येथे मतदारांची मतदान केंद्राबाहेर रांग लागली होती.

हिंगणघाट मतदारसंघात मॉक पोलच्या वेळी सहा मशीनच्या व्हीव्हीपॅटमध्ये बिघाड झाला. या सर्व मशीन बदलण्यात आल्या. पुण्यातील शिवाजीनगर विद्याभवन मतदान केंद्रावर अचानक वीज गेली.  वीज कधी येईल याची शाश्वती नसल्याने या केंद्रावर मेणबत्तीच्या प्रकाशात मतदान सुरु करण्यात आले. 



हेही वाचा -

महायुती २०० च्या पुढं जाणार नाही, मनोहर जोशी यांचा दावा

मतदानाआधी राज ठाकरे सिद्धिविनायकाच्या चरणी




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा