Advertisement

मतदानाआधी राज ठाकरे सिद्धिविनायकाच्या चरणी


मतदानाआधी राज ठाकरे सिद्धिविनायकाच्या चरणी
SHARES

विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला सोमवारी सकाळी ७ वाजता सरूवात झाली. मतदारांनी मतदान केंद्रावर रांग लावल्याचं पाहायला मिळतं आहे. त्याशिवाय अनेत राजकीय नेत्यांनी मतदान केल असून, महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी मतदान केलं आहे. मतदानापूर्वी राज ठाकरे यांनी सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं.


महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसाठी ही महत्वाची निवडणूक आहे. त्यामुळं यंदाच्या विधानसभा निवडणुकीच्या मतदानापूर्वी राज ठाकरे यांनी सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं. त्यानंतर शिवाजी पार्क येथील बालमोहन विद्यामंदिर शाळेतील मतदान केद्रावर मतदान केलं.

यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या त्यांच्या पत्नी, मुलगा अमित ठाकरे उपस्थित होते. यंदा मुंबईतील माहिम विधानसभा मतदार संघातून मनसेनं संदीप देशपांडे यांना उमेदवारी दिली असून संदीप देशपांडे देखील राज ठाकरे यांच्यसह मतदान केंद्रावर उपस्थित होते.  हेही वाचा -

Maharashtra Assembly Elections 2019 : मतदानासाठी मुंबई, ठाणे सज्ज

राज्यात विधानसभा निवडणूकीसाठी पोलिसांचा चोख बंदोबस्तसंबंधित विषय
Advertisement