Advertisement

राज्यात विधानसभा निवडणूकीसाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त


राज्यात विधानसभा निवडणूकीसाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त
SHARES

राज्यात विधानसभेच्या २८८ जागांसाठी होणारं मतदान शांततेत पार पडावं यासाठी राज्यभरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल, केंद्रीय राखीव दल, गुजरात राज्य राखीव दलाचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. त्याशिवाय, दुर्गम भागासाठी वायरलेस सेट तसेच संवेदनशील केंद्राच्या टेहाळणीसाठी ड्रोनचाही वापर करण्यात येणार आहे.

मतदारांना मतदान केंद्राबाबत माहिती मिळावी यासाठी गुगल मॅपमध्ये सर्व मतदान केंद्रे टॅग केल्यानं मतदान केंद्र नेमकं कुठं आहे, किती जवळ किंवा लांब आहे हे मतदारांना घर बसल्या समजणार आहे.

राज्यातील २७६२ मतदान केंद्रे संवेदनशील म्हणून जाहीर करण्यात आली आहेत. केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या ३५० तुकड्यांसह सुमारे तीन लाख पोलिसांचा बंदोबस्त राज्यभरात तैनात करण्यात आला आहे.

मुंबई जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंघात २५ लाख ९ हजार ५१८ इतके मतदार आहेत. सुलभ मतदान प्रक्रियेसाठी जिल्ह्यात २५९२ मतदान केंद्रे आहेत. मतदारांनी मतदानाचा हक्क बजावून आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावं, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी जोंधळे यांनी केलं आहे.

या निवडणुकीसाठी २१ हजार अधिकारी - कर्मचारी कार्यरत आहेत. तसंच, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस कर्मचारी, राज्य राखीव पोलीस दला व केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल यांचं जवानदेखील तैनात करण्यात आल्याची माहिती मुंबई शहर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जोंधळे यांनी दिली.

११ ओळखपत्रांचे पर्याय

मतदारांनी सोबत वैध मतदार ओळखपत्र आणणं गरजेचे आहे. सदर ओळखपत्र नसल्यास निवडणूक आयोगानं निश्चित केलेल्या ११ प्रकारच्या छायाचित्र ओळखपत्रांपैकी एक ओळखपत्र मतदानाला जातांना सोबत घेऊन जावं.

  • पारपत्र (पासपोर्ट)
  • वाहन चालक परवाना (Driving License)
  • छायाचित्र असलेले कर्मचारी ओळखपत्र (केंद्र / राज्य शासन /सार्वजनिक उपक्रम / सार्वजनिक मर्यादित कंपनीने दिलेले ओळखपत्र)
  • बँक किंवा पोस्ट ऑफिस द्वारे देण्यात आलेले छायाचित्र असलेले पासबुक
    पॅनकार्ड
  • नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर (NPR) अंतर्गत 'रेसिस्टेंस जीन आइडेंटिफायर' (RGI) द्वारे दिले गेलेले स्मार्टकार्ड
  • मनरेगा कार्यपत्रिका
  • कामगार मंत्रालयाद्वारे दिले गेलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड
  • छायाचित्र असलेले निवृत्तीवेतन दस्तावेज
  • खासदार / आमदार / विधान परिषद सदस्य यांना दिलेले ओळखपत्रआधारकार्ड

मतदान केंद्रांवरील सोयी सुविधा

सर्व मतदान केंद्रावर पुरुष व महिला मतदारांसाठी स्वतंत्र रांगेची व्यवस्था, मदत केंद्राची व्यवस्था, प्रथमोपचार, पिण्याचे पाणी व शौचालय या सुविधा तसेच मतदारांच्या मार्गदर्शनासाठी माहिती फलक इत्यादी सुविधा असणार आहेत. मतदान केंद्रांच्या ठिकाणी बाल संगोपन केंद्रांची सुविधा देखील उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.



हेही वाचा -

Maharashtra Assembly Elections 2019 : मतदानासाठी मुंबई, ठाणे सज्ज



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा