Advertisement

Maharashtra assembly elections 2019 : मतदानासाठी मुंबई, ठाणे सज्ज


Maharashtra assembly elections 2019 : मतदानासाठी मुंबई, ठाणे सज्ज
SHARES

विधानसभा निवडणुकांसाठी मुंबईसह उपनगर, ठाण्यातील सर्व यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. मुंबईतील ३६ विधानसभा मतदारसंघातील निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनानं जय्यत तयारी केली आहे. ठाणे जिल्ह्यातील १८ मतदारसंघांतील तयारी पूर्ण झाली असून, सकाळी ७ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत मतदानाचा कालावधी आहे.

मुंबईतील ३६ विधानसभा मतदारसंघात ३३३, ठाणे जिल्ह्यात २१३ उमेदवार रिंगणात आहेत. त्यासाठी मतदान केंद्रांची उभारणी, त्या मतदान केंद्रावर मतदानयंत्रं पोहोचविणं, आवश्यकतेनुसार सखी केंद्रे, दिव्यांगांसाठी - ज्येष्ठ नागरिकांसाठी सोय करण्यात आली आहे. सर्व मतदारांनी मतदानाचा अधिकार बजावावा, असं आवाहनही निवडणूक आयोगानं केलं आहे.


मोबाइल बंदी

मतदानकेंद्रात मोबाइल नेण्यावर बंदी घालण्यात आली आहे. मतदारांनी शक्यतो मतदान केंद्रांवर मोबाइल आणू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. समजा आणला, तर मतदानावेळी तेथील निवडणूक कर्मचाऱ्यांकडे तो जमा करावा लागेल, असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.


एसटीच्या बस आरक्षित

राज्यातील विविध विभागांतील निवडणुकीच्या कामकाजासाठी एसटीच्या १० हजार ५०० बस आरक्षित करण्यात आल्या आहेत. परिणामी राज्यभरातील विविध मार्गांवरील ५ हजार फेऱ्या रद्द केल्या जाणार आहेत. त्यामुळं दिवाळीसाठी बाहेरगावी जाणाºया प्रवाशांचे हाल होणार आहेत. एसटी महामंडळानं निवडणुकीच्या कामासाठी १० हजार ५०० एसटी बस दिल्यानं शनिवारपासूनच एसटीच्या फेऱ्या रद्द केल्या आहेत. त्यामुळे गावी जाणाऱ्या व गावाहून येणाऱ्या प्रवाशांना आरक्षण रद्द करावं लागलं. या आरक्षणाच्या तिकिटाचे पैसे परत करण्यात आले आहेत.



हेही वाचा -

ईव्हीएम मशीनची अफवा पडू शकते महागात



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा