ईव्हीएम मशीनची अफवा पडू शकते महागात

ईव्हीएम मशीनमध्ये मतदान संपल्याची वेळही नोंद होते. प्रत्येक निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे त्यासाठी एक डायरीही दिली जाते. जर कुणी अधिकचे मतदान करण्याचा प्रयत्न केलाच तर मतदान संपल्याची वेळ आणि प्रत्यक्षात अधिकचे मतदान केल्याची वेळ जुळत नाही.

SHARE

भारतात २०१४ मध्ये मोदी लाट आल्यानंतर ईव्हीएम मशीनबाबत संशय व्यक्त करत, विरोधी पक्षांनी अक्षरशः रान उठवलं होतं. ईव्हीएम हॅक होऊ शकते किंवा त्याच्याशी छेडछाड होण्याची शक्यता व्यक्त केली. मात्र ईव्हीएम मशीन हॅक होऊच शकत नाही असा दावा निवडणूक अधिकाऱ्यांकडून सुद्धा अनेकांकडून जाणून बुजून ईव्हीएम मशीनबाबत प्रश्न उपस्थित करत अफवा पसरवल्या जात आहेत. त्यामुळे अशा स्वरुपाच्या अफवा पसरवणाऱ्यांवर आता कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते.

ईव्हीएम मशीनबाबत पालिका आणि नुकत्याच देशभऱात झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. त्याबाबत निवडणूक आयोगाने नवी दिल्लीत ईव्हीएम मशीनबाबत माहिती देताना ईव्हीएम मशीनशी कोणतीही छेडछाड केली जाऊ शकत नसल्याचं स्पष्ट केलं. मुळात मतदान झाल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारीच मतदानाची वेळ संपल्यासाठीचे बटण दाबू शकतो. त्यावर निवडणूक अधिकारी आणि राजकीय प्रतिनिधींची सही असते. त्यामुळे हे सील तोडून इतर कुणालाही हे बटण दाबताच येत नाही.

ईव्हीएम मशीनमध्ये मतदान संपल्याची वेळही नोंद होते. प्रत्येक निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे त्यासाठी एक डायरीही दिली जाते. जर कुणी अधिकचे मतदान करण्याचा प्रयत्न केलाच तर मतदान संपल्याची वेळ आणि प्रत्यक्षात अधिकचे मतदान केल्याची वेळ जुळत नसल्याचे निवडणूक आयोगाकडून यापूर्वीच स्पष्ट केले होते.

विधानसभा निवडणुकीपूर्वी अनेकांनी ईव्हीएम मशीनबाबत प्रश्न उपस्थित करत, अफवा पसरवण्यात येत होत्या. मात्र या अफवा चुकीच्या असून या पुढे ईव्हीएम मशीनबाबत चुकीच्या अफवा पसरवणाऱ्यांबाबत कायदेशीर कारवाई करण्याचे निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आलं आहे. त्यामुळे व्हाॅट्स अॅप आणि इतर सोशल मिडियाद्वारे अफवा पसरवणाऱ्यांवर आता कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.हेही वाचा -

PMC बँकेच्या खातेदारांना धक्का, सर्वोच्च न्यायालयाचा सुनावणीस नकार

महाराष्ट्राचे 'हे' न्यायाधीश होणार देशाचे नवे सरन्यायाधीश
संबंधित विषय
ताज्या बातम्या