महाराष्ट्राचे 'हे' न्यायाधीश होणार देशाचे नवे सरन्यायाधीश

विद्यमान सरन्यायाधीश रंजन गोगोई १७ नोव्हेंबरला निवृत्त होणार आहेत. केंद्राच्या मंजुरीनंतर नव्या सरन्यायाधीशाच्या नियुक्तीची प्रक्रिया सुरू होणार आहे.

SHARE

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई हे निवृत्त होत आहेत. त्यांच्या जागी सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ न्यायाधीश शरद अरविंद बोबडे हे नवे सरन्यायाधीश होणार आहेत. देशाचे ४७ वे सरन्यायाधीश म्हणून १८ नोव्हेंबरला बोबडे शपथ घेण्याची शक्यता आहे. केंद्राच्या मंजुरीनंतर त्यांच्या नियुक्तीची प्रक्रिया सुरू होणार आहे. 

विद्यमान सरन्यायाधीश रंजन गोगोई १७ नोव्हेंबरला निवृत्त होणार आहेत. गोगोई यांनी न्या. बोबडे यांच्या नावाची शिफारस सरकारकडे केली आहे. तसं पत्र गोगोई यांनी  कायदा मंत्रालयाकडे पाठवलं आह. न्या. बोबडे हे महाराष्ट्रातील नागपूरचे आहेत. त्यांनी मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात वकिली केली आहे. मध्य प्रदेश हायकोर्टाचे ते न्यायमूर्तीही होते. न्या. बोबडे यांनी अनेक  महत्वाच्या खटल्यांचे कामकाज पाहिलं आहे. त्यांचा रामजन्मभूमी-बाबरी मशीद प्रकरणाची सुनावणी घेणाऱ्या घटनापीठात समावेश आहे. 

सुप्रीम कोर्टानं आधार कार्डसंबंधी खटल्यात जो आदेश दिला होता, त्या खंडपीठात न्या. बोबडे यांचा समावेश होता. न्या. बोबडे यांनी नागपूर विद्यापीठातून बी.ए. आणि एलएलबी शिक्षण घेतलं आहे. मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात त्यांनी वकिली केली. २००० साली त्यांनी हायकोर्टात अतिरिक्त न्यायाधीश म्हणून कार्यभार सांभाळला. त्यानंतर मध्य प्रदेश हायकोर्टाचे ते न्यायमूर्ती झाले. २०१३मध्ये न्यायाधीश म्हणून त्यांची सुप्रीम कोर्टात नियुक्ती झाली. हेही वाचा -

पीएमसी घोटाळा : चेक न वटवताच दिले १०.५ कोटी
संबंधित विषय
ताज्या बातम्या