पीएमसी घोटाळा : बँकेतून १०.५ कोटींची रोकड गायब

पीएमसी बँकेने बांधकाम क्षेत्रातील हाऊसिंग डेव्हलपमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड (एचडीआयएल) या कंपनीला २००८ ते २०१९ या कालावधीत नियमबाह्यपणे कर्ज दिल्याचं उघडकीस आलं होतं. पीएमसीने या कंपनीवर अक्षरक्ष कर्जाची खैरात केल्याचं समोर आलं.

पीएमसी घोटाळा : बँकेतून १०.५ कोटींची रोकड गायब
SHARES

पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँक (पीएमसी) घोटाळाप्रकरणी नवनवीन खुलासे समोर येत आहे. पीएमसीच्या रेकाॅर्डमध्ये १०.५ कोटी रुपयांची नोंदच नसल्याची धक्कादायक घटना पुढे आली आहे. तपास पथकाला एचडीआयएल आणि त्यासंबंधीत कंपन्यांद्वारे जारी केलेले चेक मिळाले आहेत. चेक बँकेत जमा न करताही त्यांना पैसे देण्यात आले होते. त्यामुळे या रकमेची नोंद बँकेच्या रेकाॅर्डमध्ये नाही. पीएमसीतील हा घोटाळा ४३३५  कोटींचा नाही तर ६५०० करोड रुपयांपेक्षा अधिक असल्याचं तपासात समोर आलं आहे. 

पीएमसी बँकेने बांधकाम क्षेत्रातील हाऊसिंग डेव्हलपमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड (एचडीआयएल) या कंपनीला २००८ ते २०१९ या कालावधीत नियमबाह्यपणे कर्ज दिल्याचं उघडकीस आलं होतं. पीएमसीने या कंपनीवर अक्षरक्ष कर्जाची खैरात केल्याचं समोर आलं. कर्जाची परतफेड होत नसतानाही ती खाती आरबीआयपासून लपवत बनावट ताळेबंद तयार करून ती माहिती रिझर्व्ह बँकेला सादर केली. दिवाळखोरीत गेलेल्या एचडीआयएलला पीएमसीने तब्बल ६५०० कोटी रुपयांचं कर्ज दिलं होतं. मात्र चौकशीत अद्याप १० कोटी रुपयांचा हिशोब तपास अधिकाऱ्यांना मिळाला नाही. तपास पथकाला जे चेक मिळाले आहेत ते १० कोटी रुपयांपेक्षा अधिक आहेत. यापूर्वी बँक अधिकाऱ्यांनी ४३३५ करोड रुपयांचा घोटाळा केल्याचं सांगण्यात येत होतं. मात्र हा घोटाळा ६५०० कोटी रुपदिवाळखोरीत गेलेल्या एचडीआयएलला पीएमसीने तब्बल ६५०० कोटी रुपयांचं कर्ज दिलं होतं. मात्र चौकशीत अद्याप १० कोटींचा हिशोब तपास अधिकाऱ्यांना मिळाला नाही.यांपेक्षा अधिक असल्याची माहिती समोर आली आहे. तर आरबीआयद्वारा नियुक्ती करण्यात आलेल्या तपास पथकाकडून याबाबत अधिक माहिती मिळत आहे का याचा शोध तपास पथकाकडून घेतला जात असल्याची माहिती सुत्रांनी दिली. 

एचडीआयएल आणि ग्रुप कंपन्यांना पैसे हवे होते. पहिल्या दोन वर्षात बँकेचे माजी संचालक जॉय थॉमस यांना चेक पाठवले होते. यावर त्यांना रोकड देण्यात आली. परंतु चेक बँकेत जमा केले नाहीत. बँकेच्या रेकॉर्ड बुकमध्ये याबबात एकही एन्ट्री करण्यात आलेली नसल्याचं तपासात समोर आलं आहे. थॉमस यांनी लाखो रुपये स्वत:जवळ ठेवल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. 



हेही वाचा -

'पीएमसी'बाबत मंगळवारी उच्च न्यायालयात सुनावणी

बेस्ट कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस मिळण्याचा मार्ग खुला




Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा