महायुती २०० च्या पुढं जाणार नाही, मनोहर जोशी यांचा दावा

​​विधानसभा निवडणुकीत २२० पेक्षा अधिक जागा मिळतील, असा दावा भाजपा-शिवसेना महायुती करत आहे. मात्र, त्यांचा हा दावा शिवसेनेचे जेष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी खोडून काढला आहे.

SHARE

विधानसभा निवडणुकीत २२० पेक्षा अधिक जागा मिळतील, असा दावा भाजपा-शिवसेना महायुती करत आहे. मात्र, त्यांचा हा दावा शिवसेनेचे जेष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी खोडून काढला आहे. महायुतीला २०० पेक्षा अधिक जागा मिळणार नाहीत, असं मनोहर जोशी यांनी म्हटलं आहे. 

मतदान केल्यानंतर एका वृत्तवाहिनीशी बोलताना मनोहर जोशी म्हणाले की, मी अनेक निवडणुक बघितल्या आहेत. कुठल्याही निवडणुकीबाबत निश्चित काही सांगणं अशक्य असतं. त्यामुळे महायुती २०० जागांचा आकडा पार करेल असं वाटत नाही. आदित्य ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत बोलताना ते म्हणाले,  मी पक्षाच्या शिस्तीत राहणारा आहे.  पक्षाच्या विरोधात मी कधी बोलत नाही. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यानंतर त्यांचे सुपुत्र महत्त्वाच्या पदावर येणार हे उघड आहे. मात्र, ते कोणतं पद घेणार हे आताच सांगता येणार नाही. यावेळी भविष्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री होईलच असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. हेही वाचा -

मतदानाआधी राज ठाकरे सिद्धिविनायकाच्या चरणी

राज्यात विधानसभा निवडणूकीसाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त
संबंधित विषय
ताज्या बातम्या