राज ठाकरेंच्या औरंगाबादमधील सभेला 'या' पक्षांचा विरोध

औरंगाबादमध्ये १ मे रोजी होणाऱ्या सभेसाठी मनसेनं जोरदार तयारी सुरू केली आहे. पण असं असलं तरी  वंचित बहुजन आघाडीसह पाच संघटनांनी राज ठाकरेंच्या औरंगाबादमधील सभेला विरोध केला आहे. राज यांच्या या सभेला परवानगी नाकारण्यात यावी असं पत्र या पाच संघटनांनी पोलीस आयुक्तांना पाठवलं आहे.

मंगळवारी दिवसभरात पाच संघटनांनी पोलीस आयुक्तांची भेट घेऊन राज ठाकरेंच्या सभेला परवानगी नाकारावी असं निवेदन दिलं.

'या' पक्ष-संघटनांचा विरोध

  • वंचित बहुजन आघाडी
  • प्रहार संघटना
  • मौलांना आझाद विचार मंच
  • गब्बर ॲक्शन संघटना
  • ऑल इंडिया पँथर सेना

सध्याची परिस्थिती, रमाजानचा महिना आणि कायदा-सुव्यवस्थेचा मुद्दा असे विविध विषय उपस्थित करत या ५ संघटनांनी पोलीस आयुक्तांना भेटून राज ठाकरेंच्या सभेला परवानगी देऊ नये अशी निवेदनं दिली आहेत.

मनसेनं पोलीस आयुक्त कार्यालयात राज ठाकरेंच्या सभेला परवानगी मिळावी यासाठी निवेदन दिलं. यावर पोलीस आयुक्त, दोन पोलीस उपायुक्त आणि सभा ज्या ठिकाणी होणार आहे त्या परिसरातील पोलीस निरीक्षक यांची बैठक झाली. त्यात राज ठाकरेंच्या सभेला परवानगी देण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही.


हेही वाचा

अयोध्या दौऱ्यासाठी मनसेची तयारी जोमात, १० ते १२ गाड्या बुक करण्याची शक्यता

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना धमकीचा फोन, Z+ सुरक्षेची मागणी

पुढील बातमी
इतर बातम्या