Advertisement

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना धमकीचा फोन, Z+ सुरक्षेची मागणी

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना धमकीचा फोन आल्याची माहिती समोर आली आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना धमकीचा फोन, Z+ सुरक्षेची मागणी
SHARES

मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांना धमकीचा फोन आल्याची माहिती समोर आली आहे. राज ठाकरे यांनी मिशिदींवरील भोंगे उतरविण्यासाठी ३ मे पर्यंतचा अल्टिमेटम दिलेला आहे. पण त्यांच्या त्या अल्टिमेटमला अनेकांनी विरोध केला आहे. पण तरीही राज ठाकरे आपल्या भूमिकेवर ठाम आहेत.

मशिदीवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरून त्यांना धमकीचे फोन येत असल्याची माहिती मनसेचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर यांनी दिली आहे. या धमकीचे फोन पाहता राज ठाकरे यांना z+ दर्जाची सुरक्षा द्यावी, अशी मागणी आता मनसेकडून केली जात आहे.

दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ५ जून रोजी अयोध्येला जाणार असल्याची घोषणा केली आहे. यासोबतच त्यांनी मशिदींवरील लाऊडस्पीकर हटवण्याची मागणी आणखी तीव्र केली आहे.

राज ठाकरे म्हणाले की, मशिदींवर लावलेल्या लाऊडस्पीकरमुळे लोकांना त्रास होतो. यासोबतच मशिदींमधील लाऊडस्पीकर हटवण्याची मागणी ही धार्मिक नसून सामाजिक असल्याचंही राज ठाकरेंनी स्पष्ट केलं.

राज ठाकरे पत्रकार परिषदेत म्हणाले, १ मे रोजी मी संभाजीनगरमध्ये जाहीर सभेला संबोधित करणार आहे. ५ जून रोजी मनसेच्या इतर कार्यकर्त्यांसह अयोध्येला जाऊन रामाचे दर्शन घेईन, इतर लोकांनाही अयोध्येला यावं असं आवाहन करेन.

" ३ मे पर्यंत मशिदींवरील लाऊडस्पीकर हटवा, नाहीतर मनसे मशिदींबाहेर 'हनुमान चालीसा' वाजवणार, लोकांना मशिदीच्या वरचा लाऊडस्पीकर हा धार्मिक मुद्दा वाटतो, पण ही सामाजिक बाब आहे. जर तुम्हाला दिवसातून पाच वेळा लाऊडस्पीकर वाजवायचे असेल तर आम्ही मशिदीबाहेर 'हनुमान चालीसा' पाच वेळा वाजवू.



हेही वाचा

BMC Elections 2022: भाजपची पालिकेविरोधात 'पोल खोल' मोहीम

महाराष्ट्रातील 'या' भागात जातीय हिंसाचारामुळे कलम १४४ लागू

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा