Advertisement

BMC Elections 2022: भाजपची पालिकेविरोधात 'पोल खोल' मोहीम

'पोल खोल' मोहिमेचा एक भाग म्हणून ही व्हॅन संपूर्ण मुंबईत फिरणार आहे.

BMC Elections 2022: भाजपची पालिकेविरोधात 'पोल खोल' मोहीम
(File Image)
SHARES

भाजपनं आगामी बीएमसी निवडणुकीसाठी "पोल खोल" मोहीम सुरू केली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेतील (BMC) भ्रष्टाचारावर भाजप आमदारांनी मोबाईल व्हॅनवरद्वारे अनेक आरोप केले.

मिळालेल्या माहितीनुसार, भाजपचे मुंबई अध्यक्ष, मंगल प्रभात लोढा यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना घरोघरी जाऊन पालिकेतील भ्रष्टाचाराबद्दल नागरिकांना सांगण्यास सांगितलं. पोल खोल मोहिमेचा एक भाग म्हणून ही व्हॅन संपूर्ण मुंबईत फिरणार आहे. पत्रा चाळजवळ गोरेगाव (पश्चिम) लेनमध्ये या व्हॅनचं लाँच करण्यात आलं.

पत्रा चाळमधील भ्रष्टाचार या व्हॅनद्वारे उघड करण्यात आला. आमदार विद्या ठाकूर यांनी मोतीलाल नगर पुनर्विकासासोबत अनेक विषयांवर भाष्य केलं.

पुढील महिनाभर दररोज सायंकाळी शहरातील चौकांमध्ये ही मोहीम राबवण्यात येणार असल्याची माहिती आमदार आणि मुंबई प्रभारी अतुल भातखळकर यांनी दिली.

भाजप शिवसेनेवर भ्रष्टाचाराचे आरोप करत असताना शिवसेनेने मात्र त्यांच्याशी युती करण्याबाबत मौन बाळगले आहे. दुसरीकडे, लोढा यांनी कथितपणे स्पष्ट केलं की, शहरातील एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी पोहोचण्यासाठी लोकांना दोन तास लागतात. नागरिक कर भरतात. पण त्यांना खड्ड्यांच्या समस्येला सामोरं जावे लागते.

यासोबतच पालिका रुग्णालयांच्या दुरावस्थेबद्दलही लोढा यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. पालिका रुग्णालयांमधील भोंगळ कारभारामुळे नागरिक खाजगी रुग्णालयांमध्ये जातात. ते पुढे म्हणाले की, नागरिक त्यांच्या कामात खूप व्यस्त असतात म्हणून त्यांना त्यांच्या हक्कांसाठी लढायला वेळ नसतो. पण आम्ही त्यांची जबाबदारी स्विकारतो.

लोढा यांनी मुंबई मेट्रो कारशेडच्या मुद्यावर सविस्तरपणे सांगितलं की, सध्याच्या राज्य सरकारन कारशेडच्या विषयाला अहंकाराचा मुद्दा बनवला आहे.



हेही वाचा

महाराष्ट्रातील 'या' भागात जातीय हिंसाचारामुळे कलम १४४ लागू

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा ५ जूनला अयोध्या दौरा

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा