Advertisement

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा ५ जूनला अयोध्या दौरा

मशिदींवरील लाऊडस्पीकर ही धार्मिक नसून सामाजिक समस्या असल्याचं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा ५ जूनला अयोध्या दौरा
SHARES

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ५ जून रोजी अयोध्येला जाणार असल्याची घोषणा केली आहे. यासोबतच त्यांनी मशिदींवरील लाऊडस्पीकर हटवण्याची मागणी आणखी तीव्र केली आहे.

राज ठाकरे म्हणाले की, मशिदींवर लावलेल्या लाऊडस्पीकरमुळे लोकांना त्रास होतो. यासोबतच मशिदींमधील लाऊडस्पीकर हटवण्याची मागणी ही धार्मिक नसून सामाजिक असल्याचंही राज ठाकरेंनी स्पष्ट केलं.

राज ठाकरे पत्रकार परिषदेत म्हणाले, १ मे रोजी मी संभाजीनगरमध्ये जाहीर सभेला संबोधित करणार आहे. ५ जून रोजी मनसेच्या इतर कार्यकर्त्यांसह अयोध्येला जाऊन रामाचे दर्शन घेईन, इतर लोकांनाही अयोध्येला यावं असं आवाहन करेन.

" ३ मे पर्यंत मशिदींवरील लाऊडस्पीकर हटवा, नाहीतर मनसे मशिदींबाहेर 'हनुमान चालीसा' वाजवणार, लोकांना मशिदीच्या वरचा लाऊडस्पीकर हा धार्मिक मुद्दा वाटतो, पण ही सामाजिक बाब आहे. जर तुम्हाला दिवसातून पाच वेळा लाऊडस्पीकर वाजवायचे असेल तर आम्ही मशिदीबाहेर 'हनुमान चालीसा' पाच वेळा वाजवू.

शिवसेना युवासेना प्रमुख आणि महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हेही अयोध्येला जाणार आहेत. आपण लवकरच अयोध्येला जाणार असल्याचे आदित्यनं शनिवारी जाहीर केलं.

मे महिन्याच्या सुरुवातीला ते अयोध्येला जाऊ शकतात. अयोध्या दौऱ्याबाबत खासदार संजय राऊत यांच्याशी चर्चा केल्याचं त्यांनी सांगितलं. अयोध्या दौऱ्याबाबतचा कार्यक्रम लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.



हेही वाचा

राष्ट्रवादीचं मनसेला प्रत्युत्तर, हनुमान मंदिरात करणार इफ्तार पार्टी!

राज ठाकरेंच्या 'त्या' भुमिकेनंतर ३५ मुस्लिम कार्यकर्त्यांचा राजिनामा

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा