Advertisement

भोंग्यांवरून महागाईबाबत माहिती द्या, आदित्य ठाकरेंचा मनसेला टोला

ठाण्यातील एका मेळाव्यात, या आठवड्याच्या सुरुवातीला, मनसे प्रमुखांनी महाविकास आघाडीला (MVA) 3 मे पर्यंत मशिदींमधील लाऊडस्पीकर काढण्याच्या सुचना दिल्या होत्या.

भोंग्यांवरून महागाईबाबत माहिती द्या, आदित्य ठाकरेंचा मनसेला टोला
(File Image)
SHARES

पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी मनसेला खोचक टोला लगावला आहे. मनसेनं भोंगे जरूर लावावेत, पण त्यावरून देशातील वाढत्या महागाईबाबत जनतेला माहिती द्यावी, अशी टिप्पणी आदित्य ठाकरे यांनी केली आहे.

ईदनंतर मशिदींवरील भोंगे काढले नाहीत तर देशभरात अशा मशिदींसमोर भोंग्यावर हुनमान चालिसा लावा, असा आदेश मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिले आहेत. मनसेच्या या भूमिकेबाबत पत्रकारांनी आदित्य ठाकरे यांना प्रश्न विचारला.

त्यावर आदित्य ठाकरे म्हणाले, या विषयावर मला फार बोलायचे नाही. पण मनसेनं भोंगे लावल्यास त्यावरून देशातील वाढत्या महागाईबाबत जनतेला माहिती द्यावी. पेट्रोल-डिझेल, सीएनजी आणि अन्य गोष्टींची दरवाढ कशामुळे झाली, हे मनसेने भोंग्यांवरून सांगावे. तसंच, ६० वर्षांपूर्वींचा इतिहास न उगाळता गेल्या २-३ वर्षांमध्ये काय झालं, हे सांगावं. त्यामुळे जनतेचं प्रबोधन होईल, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

आदित्य ठाकरे यांच्या या वक्तव्यानंतर मनसे नेते संदिप देशपांडे यांनी त्याला प्रत्युत्तर दिलं आहे.

ते म्हणाले, महागाईवर आम्हीच बोलायचे, पेट्रोल दरवाढीवर पण आम्हीच बोलायचे, कोरोना काळात जेव्हा तुम्ही लपून बसला तेव्हा लोकांच्या समस्या पण राजसाहेबांनीच सोडवायच्या आणि तुम्ही काय फक्त प्रॉपर्टी गोळा करणार आणि टेंडर मधल कमिशन खाणार का? अशी टीका संदिप देशपांडे यांनी केली आहे.

राज ठाकरे यांनी महाविकास आघाडीला ३ मे पर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. सरकारनं आपल्या मागण्या मान्य न केल्यास राज्यव्यापी आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला.

ते म्हणाले, “सर्व मौलवींच्या बैठका घ्या आणि मशिदींमधून लाऊडस्पीकर काढा. ३ मे नंतर लाऊडस्पीकर असलेल्या मशिदीबाहेर हनुमान चालीसा वाजवली जाईल.

२ एप्रिल रोजी गुढीपाडव्याला शिवाजी पार्कवर झालेल्या मेळाव्यात ठाकरे यांनी मशिदींतील लाऊडस्पीकर हटवण्याची मागणी सर्वप्रथम केली होती. या मागणीवर विविध स्तरातून नाराजी व्यक्त होत आहे. यात मनसेचेच कार्यकर्ते, अजित पवार, शरद पवार, संजय राऊत आदींचा समावेश होता.



हेही वाचा

राष्ट्रवादीचं मनसेला प्रत्युत्तर, हनुमान मंदिरात करणार इफ्तार पार्टी!

राज ठाकरेंच्या 'त्या' भुमिकेनंतर ३५ मुस्लिम कार्यकर्त्यांचा राजिनामा

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा